ETV Bharat / state

Wardha Crime: दुचाकी तपासताना आढळला सुगंधित तंबाखू; वर्धा पोलिसांची कारवाई - सुगंधित तंबाखू जप्त

वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल (शनिवारी) सुगंधी तंबाखूवर जोरदार कारवाई केली. यावेळी दुचाकीला बांधलेली सुगंधित तंबाखूची अनेक पाकिटे आढळून आली. पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे. वर्धेचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी जो विश्वास स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यावर दाखविला त्या विश्वासाला सार्थ ठरवत स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तथा अधिकारी सातत्याने गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरत आहे.

Wardha Crime
सुगंधित तंबाखू जप्त
author img

By

Published : Feb 12, 2023, 6:02 PM IST

वर्धा: जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारांची दाणादाण उडालेली आहे. त्याचबरोबर अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. अवैध व्यवसाय उध्वस्त करण्यात पोलिसांनी कोणतीही काटकसर सोडली नसल्याचे पुरावे वारंवार समोर येत आहेत. अशीच कारवाई वर्धा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका ठिकाणी करण्यात आलेली आहे. वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना, विक्री करता सुगंधित तंबाखू वर्धा येथे मोटरसायकल वरून येत असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली. ही कारवाई अन्न व औषधी सुरक्षा विभागास देण्यात आली.

परप्रांतातून तंबाखूची आयात: घटनेची माहिती कळताच अन्नसुरक्षा अधिकारी घटनास्थळी हजर झाल्याने त्यांनी स्नेहल नगर, चौक सेवाग्राम रोड येथे नाकाबंदी केली. एका दुचाकीला थांबून त्यांचे ताब्यातील मोटरसायकलची पाहणी केली असता त्यामध्ये सुगंधित तंबाखूची एक किलो वजनांची अनेक सीलबंद पाकिटे आढळून आली. यासंदर्भात आरोपीस विचारपूस केली असता हा सुगंधित तंबाखू पांडुरना, मध्य प्रदेश येथून शंकर नावाचे इसमांकडून खरेदी करून आणल्याचे मात्र याचे बिल नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरून वर्धा शहर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवाडे यांच्या मार्गदर्शनात तसेच पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजय गायकवाड वर्धा यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, गजानन लांबसे, अमोल ढोबळे आणि अभिजीत वाघमारे यांनी केली आहे. पोलिसांच्या या दमदार कारवाईचे कौतुक होत आहे.

अकोल्यात सुगंधित तंबाखू जप्त: अकोला पोलिसांनी 12 फेब्रुवारी, 2021 रोजी तंबाखूसह आयशर ट्रक असा २० लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. चालक मेहबूबमिया पिरसाहबमिया आणि क्लिनर रहमतमिया अहमदमिया मलिक यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले होते.

गोंदिया पोलिसांची कारवाई: गोंदिया तालुक्यातील चिचगड रोडवरील परस टोल्याजवळ एका संशयित वाहनातून १६ हजाराचा सुगंधित तंबाखूसाठा देवरी पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई गुरुवारी २७ ऑगस्ट, 2020 रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास झाली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. चिंचगड रस्त्यावरील कृष्णा हार्डवेअर समोर पोलिसांना एक टाटा सुमो (क्र. सीजी. ०७ एम १८९८) संशयितरित्या आढळून आली होती. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात २ प्लास्टिक पोत्यांमध्ये तंबाखूची २०० पाकिटे आढळली. प्रत्येक पाकिटांची किंमत ८० रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी ही सर्व पाकिटे व अडीच लाख किंमत असलेली टाटा सुमो जप्त केली होती. तसेच एका आरोपीला अटक केली होती. याप्रकरणी देवरी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक किशोर लिल्हारे यांच्या तक्रारीवरून देवरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा: Governor Bhagat Singh Koshyari: 'या' कारणांमुळे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द ठरली वादग्रस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.