ETV Bharat / state

वर्ध्यात खासगी रुग्णालयाची तोडफोड, चौघांवर गुन्हा दाखल - महिलेवर उपाचार झाला नाही

शहरातील मागील आठवड्यात गंभीर अवस्थेत असलेल्या महिलेला घेऊन चार युवक डॉ. तोटे यांच्या रुग्णलायत आले. यावेळी प्रथमिक तपासणी करत दुसरीकडे नेण्यास सांगितले. पण दरम्यान महिलेला दुसरीकडे नेण्यात आले. पण त्यानंतर महिलेचा मृत्यू झाला.

sdfa
वर्ध्यात खासगी रुग्णालयाची तोडफोड
author img

By

Published : May 15, 2021, 12:35 PM IST

Updated : May 15, 2021, 1:01 PM IST

वर्धा - शहरातील श्री हॉस्पिटलमध्ये महिलेला उपचारासाठी दाखल न करून घेतल्याच्या रागातून ४ युवकांनी त्या रुग्णालयाची तोडफोड केली. तसेच तेथील डॉक्टरलाही धक्काबुक्की केल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला आहे. यावेळी रुग्णालयाबाहेरील कारवर दगडफेक करतानाची दृ्श्ये सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्यानंतर या तोडफोड प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्ध्यात खासगी रुग्णालयाची तोडफोड
शहरातील मागील आठवड्यात गंभीर अवस्थेत असलेल्या महिलेला घेऊन चार युवक डॉ. तोटे यांच्या रुग्णलायत आले. यावेळी प्रथमिक तपासणी करत दुसरीकडे नेण्यास सांगितले. पण दरम्यान महिलेला दुसरीकडे नेण्यात आले. पण त्यानंतर महिलेचा मृत्यू झाला. 12 मे रोजी हा राग डोक्यात घेऊन हे युवक डॉ. तोटे यांच्या दवाखान्यात आले. यावेळी बाचाबाची झाली. पण शुक्रवारी पुन्हा त्याच युवकांनी रुग्णालयात जाऊन तोडफोड केली. यात डॉक्टरला धक्काबुकी केली तसेच कॅबिनच्या काचा फोडल्याचा प्रकार समोर आला.
वर्ध्यात खासगी रुग्णालयाची तोडफोड,
वर्ध्यात खासगी रुग्णालयाची तोडफोड,
या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या दृश्याच्या आधारे चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Last Updated : May 15, 2021, 1:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.