ETV Bharat / state

वर्ध्यात दारुविक्रेता मारहाण प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल; सावंगी मेघेच्या उपसरपंचही सहभागी - वर्धा

दारूविक्रेता राकेश कांबळेला क्षुल्लक कारणावरून चौघांनी लोखंडी रॉडने मारहाण केली होती. यामध्ये राकेश गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

उपसरपंच विलास दौड
author img

By

Published : Jun 28, 2019, 11:14 AM IST

Updated : Jun 28, 2019, 3:29 PM IST

वर्धा - जिल्ह्यातील सावंगी (मेघे) येथील दारूविक्रेता राकेश कांबळे मारहाण प्रकरणात गावातील उपसरपंचावर हत्येचा कट रचण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास दौड असे उपसरपंचाचे नाव आहे. तसेच त्यांच्यासह आणखी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांचा तपास सुरू आहे.

दारूविक्रेता राकेश कांबळेला क्षुल्लक कारणावरून चौघांनी लोखंडी रॉडने मारहाण केली होती. यामध्ये राकेश गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ४ आरोपी संदीप ढोके, योगेश पेटकर, मंगेश गुरनुले तसेच पंकज ठाकरेला अटक केली होती. तसेच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

वर्ध्यात दारुविक्रेता मारहाण प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल

दरम्यान या प्रकरणाची चौकशी करीत असताना उपसरपंच विलास दौड यांचे पाचवे नाव समोर आले. सर्व आरोपी घटनेच्या दिवशी विलास दौड यांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी दौड विरोधात हत्येचा कट रचण्याचा गुन्हा दाखल केला. मात्र, दौड सध्या फरार असून सावंग पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे तपास ठाणेदार रेवचंद सिंगणजुडे यांनी सांगितले.

Intro:सावंगी मेघेच्या उपसरपंचावर खुनाचा आरोपावरून गुन्हा दाखल

- खुनाच्या तपासत पाचवे नाव आले पुढे
- विलास दौड फरार असून तपास सुरू

सावंगी (मेघे) येथील दारूविक्रेता राकेश कांबळे हत्या मारहाण झाली होती. त्या प्रकरणात दवाखान्यात मृत्यू झाल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरू असताना चौघांना अटक करण्यात आली होती. यात तपासत मात्र खुनाचा कट रचण्याचा गुन्हा सावंगी मेघे येथील उप सरपंचावर दाखल करण्यात आला आहे. विलास दौड असे उपसरपंचाचे नाव आहे.

सावंगी पोलीस स्टेशन अंतर्गत दारू विक्रेता राकेश कांबळे शुल्लक कारणावरून लोखंडी रॉडणे चौघांनी मारहाण केली होती. यात गंभीर जखमी झाल्याने सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात राकेशचा मृत्यू झाला. या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी संदीप ढोके, योगेश पेटकर, मंगेश गुरनुले, व पंकज ठाकरे याला सावंगी पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडी मिळवत विचारपूस केली असता त्यांच्याकडून घटनाक्रमाची कबुली करून घेतली. त्यांनतर चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

मात्र या चौकशी दरम्यान पाचवे नाव समोर आले ते सावंगी मेघे येथील उपसरपंच विलास दौड याचे. विशेष घटनेच्या दिवशी विलास दौड यांचा संपर्कात चौघेही असल्याचे तपासत समोर आले. याप्रकरणी सावंगी पोलिसांनी कलम १२० (ब) वाढवले. राकेश कांबळे याच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी ठरणारा आरोपी विलास दौड याने
हत्येचा कट केल्याने पोलीस विलास दौडचा शोध घेत आहे. सध्या फरार असून त्याचा शोध सावंगी पोलीस घेत आहेत. पुढील तपास ठाणेदार रेवचंद सिंगणजुडे करीत आहे.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Jun 28, 2019, 3:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.