ETV Bharat / state

मोहता मिलच्या 607 कामगारांवर उपासमारीची वेळ, वेतन थकवल्याने गुन्हा दाखल - wardha mohta mill

हिंगणघाट शहरातील सध्याच्या घडीला सर्वात जुनी कंपनी म्हणून मोहता मिल कंपनी आहे. लॉकडाऊनमुळे 14 मार्चपासून काम बंद करण्यात आले. पण कोरोनाचा संकटावर उपासमारीची वेळ येऊ नये, म्हणून कामगारांना वेतन देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

FIR against Mohta mills for not paying salary to workers wardha
मोहता मिलच्या 607 कामगारांवर उपासमारीची वेळ, वेतन थकवल्याने गुन्हा दाखल
author img

By

Published : Apr 24, 2020, 7:40 AM IST

वर्धा - एकीकडे कोरोनाचे संकट दुसरीकडे लेकराबाळांना काय खाऊ घालायचे, हा प्रश्न सध्या कामगारांना सतावत आहे. यातच 125 वर्षांचा इतिहास असणाऱ्या मोहता इंडस्ट्रीज कंपनीने वेतन थकवल्याने कामगार मात्र हतबल झाले. प्रशासनाने सूचना देऊनही वेतन न दिल्याने अखेर हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. विनोद कुमार मोहता आणि प्रशांत जैन अशी गुन्हा दाखल झालेल्या कंपनी संचालकांची नवे आहेत. पण कामगारांनी पुढे काय करायचे, हा प्रश्न कायम आहे.

हिंगणघाट शहरातील सध्याच्या घडीला सर्वात जुनी कंपनी म्हणून मोहता मिल कंपनी आहे. यात लॉकडाऊनमुळे 14 मार्चपासून काम बंद करण्यात आले. पण कोरोनाचा संकटावर उपासमारीची वेळ येऊ नये, म्हणून कामगारांना वेतन देण्याचे आदेश राज्य सरकराने दिली आहे. मात्र मोहता मिलच्या 607 कामगारांना मागील दोन महिण्यापासूनचे वेतन दिलेच नाही. याबाबत हिंगणघाटच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे आफताब खान यांनी आवाज उचलत वेतन मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाला तक्रार करत प्रकार उघडकीस आणला. यावर उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी वेतन देण्याच्या सूचना मोहता मिल कंपनी प्रशासनाला दिल्यात. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सुद्धा वेतन अदा करण्याचे आदेश दिले. पण आदेशाचे पालन करण्याऐवजी पायमल्ली करण्यात आली.

अखेर हिंगणघाट पोलीस स्टेशनला उविभागीय अधिकारी खंडाईत यांच्या वतीने मोहता इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक विनोद कुमार मोहता आणि प्रशांत जैन इंटेरियम रिसोल्युशन प्रोफेशनल यांच्या विरोधात साथ रोग अधिनियम यासह विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अद्याप तरी कोणाला अटक झाली नसल्याचे सांगितले जात आहे. पुढील कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार करणार आहे.

मोहता मिलच्या 607 कामगारांवर उपासमारीची वेळ, वेतन थकवल्याने गुन्हा दाखल
पण कंपनी प्रशासनच्या संचालकानावर गुन्हा दाखल झाला असला तरी कामगाराचा उपासमारीचा प्रश्न सुटलेला नाही. यामुळे दोन महिण्याचे वेतन न मिळल्याने त्याचावर आर्थिक संकटासह कुटुंबाच्या उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाला तात्काळ निर्णय घेऊन त्याचा प्रश्न निकाली काढण्याचे आव्हान बाकी आहे. शिवाय पुढे कामगारांच्या कामाचा प्रश्न पुढे असणारच आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.