वर्ध्यात कोरोनाचा वाढता कहर, एका दिवसात 5 जणांचा मृत्यूने भीतीचे वातावरण - वर्ध्यातील कोरोनास्थिती
आधी अनेक दिवस ग्रीन झोनमध्ये असलेला जिल्हा आता मृत्यूच्या रेड झोनमध्ये जात आहे. अशातच नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याला जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे.
![वर्ध्यात कोरोनाचा वाढता कहर, एका दिवसात 5 जणांचा मृत्यूने भीतीचे वातावरण वर्धा कोरोना](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8781666-1000-8781666-1599942296146.jpg?imwidth=3840)
वर्धा - वर्ध्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत कोरोनाच्या संख्येत वाढ होत आहे. ग्रीन झोनमध्ये असणारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढतोय सोबतीला मृत्यूची संख्या सुद्धा वाढत आहे. शनिवारचा दिवस वर्धेकरांसाठी काळजाचा थोके वाढवणारा ठरला. शनिवारी जिल्ह्यात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
वर्ध्यात सध्याच्या घडीला 2 हजार 437 रुग्ण बाधित झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 25 हजार 999 लोकांची चाचणी झाली. शनिवारी मृत्यू झालेल्यामध्ये 65 वर्षीय आणि 94 वर्षीय महिलेचा समावेश आहे. सोबतच 45 वर्षीय आणि 78 वर्षीय पुरुषांचा मृत्यू झाला आहे. तर हिंगणघाट येथील 84 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. मात्र, जिल्ह्यात आतापार्यंत 1 हजार 201 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई -
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात मास्क न घालणाऱ्या 154 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कोविड नियमावलीत नुसार भंग करणाऱ्या दोन दुकान चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेत 33 हजार 550 रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे.
कोरोना चाचणीची संख्या वाढवल्यानंतर कोरोनाची अँटीजेन चाचणीचे अहवाल वाढवण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात दररोज चाचणी सुरू आहे. यासह नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे.