ETV Bharat / state

चिंतन, मनन तर झाले... हिंगणघाट सारख्या घटना होऊ नये यासाठी पुढे काय?

author img

By

Published : Feb 16, 2020, 8:15 PM IST

समाजाच्या दृष्टीने स्त्रियांची सुरक्षा हा चिंतेचा विषय आहे. हिंगणघाट जळीतकांडसारखे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी महात्मा गांधी आणि विनोबांच्या विचारांना अनुसरुन समाज घडविण्यासाठी पशु संवर्धनमंत्री सुनील केदार यांनी सकाळी ८ ते संध्याकाळी ८ असा १२ तास उपवास केला. त्यांच्या या उपवासात विद्यार्थी, सामाजिक संघटना, राजकीय संघटना, लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.

सामूहिक उपवास, आत्मचिंतन आणि श्रद्धांजली कार्यक्रम

वर्धा - जिल्ह्यातील हिंगणघाट इथल्या घटनेने महाराष्ट्र पुरता हादरून गेलाय. या घटनेतून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची क्रूरता दिसून आली. क्रूरतेच हे रूप याच समाजातील एका विकृतीमुळे पुढे आले. असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी महात्मा गांधी आणि विनोबांच्या विचाराला अनुसरून समाज घडवण्यासाठी चिंतन मनन करण्याची गरज पुढे आली. पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी सकाळी ८ ते सायंकाळी ८ पर्यंत उपवास आणि आत्मचिंतन करत समाजाला विचार करण्याची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले.

यंदाचे वर्ष महात्मा गांधीचे १५० तर विनोबाजींचे १२५ वे जयंतीवर्ष आहे. गांधीजींनी सांगितलेल्या हिंसेचा त्याग करण्यासाठी समाज कुठे तरी कमी पडत आहे. समाजाच्या दृष्टीने स्त्रियांची सुरक्षा हा चिंतेचा विषय आहे. असे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी महात्मा गांधी आणि विनोबांच्या विचारांना अनुसरुन समाज घडविण्यासाठी पशु संवर्धनमंत्री सुनील केदार यांनी सकाळी ८ ते संध्याकाळी ८ असा १२ तास उपवास केला. त्यांच्या या उपवासात विद्यार्थी, सामाजिक संघटना, राजकीय संघटना, लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते. यामुळे महिलांना सन्मान दिला पाहिजे, ही बाब समाजात रूजने गरजेचे असल्याचेही पुढे आले.

यावेळी माजी आमदार अमर काळे यांनी दुर्गा म्हणून आदिशक्तीला पुजले जाते. मात्र, दुसरीकडे होणाऱ्या घटना पाहता सर्व समाजाने आत्मचिंतन केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. यामध्ये सकाळपासून सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधींसह महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवकांनीसुद्धा सहभाग नोंदवला.

हेही वाचा - वर्ध्यात पालक मंत्र्याच्या उपस्थितीत महिला हिंसाचारविरोधात सामूहिक उपवास अन् आत्मचिंतन

या उपक्रमाची सुरुवात रामधुनने झाली. रात्री पीडितेला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्वधर्म प्रार्थना करत उपवासाची सांगता करण्यात आली. हिंगणघाटमध्ये जे घडले ते दुर्दैवी आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या थोर पुरुषांनी दिलेल्या विचारांना समाजात रुजवणे गरजेचे आहे. महिलांचा सन्मान झालाच पाहिजे. मात्र, समाजात वावरताना हे काम केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचे आहे, असे न समजता यावर चिंतन करणेही गरजेचे आहे.

हेही वाचा - वर्ध्याच्या इंझापूर डम्पिंग यार्डला आग, खत निर्मिती केंद्र जळून खाक

हेही वाचा - वर्धा : लग्नात आलेल्या वऱ्हाड्याचा लग्नातील ट्रॅव्हल्सच्या चाकाखाली आल्याने मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.