ETV Bharat / state

Rain Affect Farmers : वर्ध्यात अवकाळी पावसाचा हाहाकार; शेतीतील पीके जमिनदोस्त - कर्माबाद भागात पावसाने हाहाकार माजवला

वर्धा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील निंबोली, काशिमपूर, सर्कसपूर, एथलापूर, टोणा, अहिरवाडा, रहिमाबाद, देउरवाडा, अंबिकापूर, भाईपूर, दौलतपूर, कर्माबाद भागात पावसाने हाहाकार माजवला असून शेतातील पीके जमिनदोस्त झाली आहेत.

Unseasonal Rains Affect Farmer
Unseasonal Rains Affect Farmer
author img

By

Published : Apr 8, 2023, 4:55 PM IST

Updated : Apr 8, 2023, 7:52 PM IST

अवकाळीने नागरिकांचे प्रचंड नुकसान, शेतीला फटका

वर्धा : जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. जिल्ह्यातील निंबोली, काशिमपूर, सर्कसपूर, एथलापूर, टोणा, अहिरवाडा, रहिमाबाद, देउरवाडा, अंबिकापूर, भाईपूर, दौलतपूर, कर्माबाद आदी भागात अवकाळी पावसाने नुकसान केले आहे. सततच्या खराब हवामानाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शेतकरी हतबल झाला आहे. अवकाळीचा पंचनामा करून शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गतवर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यातून सावरण्यासाठी रब्बी हंगामात हरबरा आणि गहू पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, त्यालाही अवकाळी पावसाने नेस्तनाबूत केले आहे. हरभरा पिक नैसर्गिक आपत्तीतून कसेबसे वाचले. पण हातातोंडाशी आलेले गव्हाचे पीक पावसाने मातीत मिळवले आहे.

आपण कसे जगले पाहिजे : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता जगायचे कसे, असा सवाल शेतकरी करत आहे. नुकसानीमुळे शेतकऱ्यावर बिकट परिस्थिती निर्माण झाली असून नुकसान भरपाई कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे. तरच शेतकरी अवकाळी पावसापासून सावरेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

घराचे पत्रे उडाले : जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून मोठे नुकसान झाले आहे. वारा, विजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळीने अनेक नागरिकांच्या घरावरचे पत्रे उडून गेले आहेत. या खराब हवामानाचा सर्वाधिक फटका देवळी तालुक्याला बसला आहे. देवळी तालुक्यातील काही भागात गारपिटीमुळे तेथील पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. एकूणच वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला असून शेतकरी, शेतमजूर इतर नागरिकांनाही याचा फटका बसला आहे. जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून हवेत गारवा निर्माण झाला आहे.

8 एप्रिलपर्यंत पावसाचे संकेत : प्रादेशिक हमाम नागपूर मंडळाने शनिवार, 8 एप्रिलपर्यंत मुसळधार पावसाचे संकेत दिले आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन नुकसान टाळण्यासाठी जिल्हा शताब्दीधारकांना प्रशासनामार्फत माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रादेशिक हवामान विभाग, नागपूर यांच्याकडून 8 एप्रिल रोजी प्राप्त झालेल्या संदेशानुसार जिल्ह्यात 30 ते 40 मैल प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - PM Modi In Hyderabad: पंतप्रधान मोदींनी सिकंदराबाद- तिरुपती वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा, केसीआर यांची दांडी

Last Updated : Apr 8, 2023, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.