वर्धा - जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रीया सकाळी सात वाजता सुरू झाली होती. यात हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात समुद्रपूर तालुक्यातील मोहगाव येथील मतदान केंद्रातील ईव्हीएममध्ये सकाळी बिघाड निर्माण झाला होता. यामुळे या मतदार केंद्रावर जवळपास दीड तास मतदान प्रक्रियेचा खोळंबा निर्माण झाला होता. तांत्रिक बिघाड दुरुस्त करत व्हीव्हीपॅट बदलल्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाले.
तर हिंगणघाट शहरातील संत कबीर वॉर्ड येथील समाज मंदिर बुथ क्रमांक 259 वरील ईव्हीएममध्ये सकाळी 7 वाजल्यापासून बिघाड आला होता. यात सीआरसी मॉकपोलनंतर बंद केलेली बटन सुरू करून अर्ध्या तासात ही मशीन सुरू करण्यात आली.
हेही वाचा - वाघाच्या भीतीमुळे 'या' गावात झाले नाही मतदान...
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात अन्य केंद्रांवर माँक पोलच्यावेळी व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड आला होता. हा बिघाड तत्काळ दुरुस्त करत मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. सकाळी 10 वाजतपर्यंत मतदानाची टक्केवारी कमी होती. मात्र, 10 नंतर मतदारांनी घराच्या बाहेर निघून मतदानात मोठा सहभाग नोंदविला होता. दीव्यांग मतदार देखील मतदानाचा हक्क बजवताना दिसून येत आहे.
आमदार समीर कुणावार यांनी आपल्या परिवारासह हिंगणघाट येथील जिल्हा परिषद केंद्र प्रायमरी शाळेत मतदान केले. तर माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी देखील आपल्या परिवारासह मतदान केले .
हेही वाचा - वर्ध्यात मेणबत्ती लावून पार पडले मतदान; वादळी वाऱ्याचा फटका