वर्धा - अनेक दिव्यांग मुलांना काहीतरी करण्याची उमेद असते. पण, अपुरी साधन सामुग्री आणि असलेले दिव्यांगत्व यात अडसर ठरते. या होतकरू दिव्यांगांना स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर खासदार रामदास तडस यांच्या खासदार निधीतून इलेक्ट्रिक ट्रायसिकल मोपेड वाटप करण्यात आली. देवळीच्या इंडोअर स्टेडियममध्ये एका कार्यक्रमात ट्रायसिक मोपेड खासदार तडस यांची हस्ते देण्यात आल्या आहे.
काही तरी करण्याची जिद्द उराशी असते. पण, प्रत्यक्ष काम करतांना अडचणींना सामोर जावे लागतात. त्यांच्या नशिबी आलेले दिव्यांगत्व त्याचा उदरनिर्वाहसाठी अडसर ठरू नये. त्यांना घरातच बसून राहण्याची वेळ येऊ येणे. यासाठी या ट्रायसिकल मोपेडच्या माध्यमातून त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एक छोटीशी मदत या माध्यमातून केली जात आहे.
यामध्ये काही दिव्यांग दरवर्षी निवडले जातात. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापनाच्या दिवशी त्यांना मोपेड ट्रायसिकल वाटप करण्यात आल्या आहेत. यात काहींना या ट्रायसिकलच्या माध्यमातून गावोवावी जाऊन व्यवसाय करण्यास मदत होणार आहे. तेच यातील एक जण 12 वीत 90 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला असून पुढील शिक्षणासाठी घराबाहेर पडताना होणाऱ्या अडचणींवर त्याला पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली.
इंडोअर स्टेडियमवर हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी खासदार रामदास तडस, समाज कल्याण विभागाचे साहाय्यक आयुक्त अनिल वाळके, माजी नगराध्यक्षा शोभा तडस, नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष डॉ नरेंद्र मदनकर, सभापती सारिका लाकडे आदी उपास्थित होते.
सहा विधानसभा मतदार संघातून होते निवड
दरवर्षी खासदार निधीतून 10 लाख रुपये हे दिव्यांग बांधवाना ट्रायसिकल मोपेड वाटपासाठी खर्च करण्यात येते. यंदाही स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर 13 दिव्यांग बांधवाना इलेक्ट्रिक ट्रायसिकल मोपेड वाटप करण्यात आली. यात सहा विधानसभा मतदार संघातून या दिव्यांग बांधवांची निवड करण्यात आली असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी ‘ईटीव्ही भारत’ला दिली.