वर्धा - जिल्ह्यातील सेलू तालुक्यात घरातील कुलरचा विद्युत करंट लागून एकाच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. कुलरमध्ये पाणी टाकत असताना ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. सय्यद आझम सय्यद तबेल अली असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो सेलू येथील चिंचबनपुरा येथील राहिवासी आहे.
सय्यद कुलरमध्ये पाणी भरायला गेला. कुलरमध्ये विद्युत प्रवाह आल्याने पाणी टाकताना त्याचा स्पर्श झाला. त्यामुळे तो अचानक खाली पडला. पतीला पडलेल्या अवस्थेत दिसताच पत्नीने कुलर बंद केला. पतीची कुठलीच हालचाल होताना दिसत नसल्याने पत्नीने आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांना कळवले. लोकांच्या मदतीने सय्यदला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तपासणी करुन सय्यदला मृत घोषित केले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.