ETV Bharat / state

काँग्रेसचा विदर्भात दुष्काळ दौरा, बुलडाण्यातून होणार सुरुवात

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशावरून महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्याची आखणी करण्यात आली आहे. विदर्भात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेत ११ जणांची समिती तयार करण्यात आली आहे.

दुष्काळ
author img

By

Published : May 12, 2019, 5:17 PM IST

वर्धा- यंदा पर्यजन्यमान कमी झाल्याने विदर्भातील अनेक भागांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यातच विदर्भात तापमानाने उच्चांक गाठला आहे. विदर्भाचे सध्याचे तापमान ४५ अंशाचा घरात असताना पिण्याच्या पाण्यासाठी शोधा शोध करावी लागत आहे. काँग्रेससाठी भाजप सरकारला दुष्काळाच्या नावावर कोंडीत पकडण्यासाठी ही संधी असणार आहे. पश्चिम विदर्भातील बुलडाण्यातून काँग्रेसचा १३ मे पासून दुष्काळ दौरा सुरू होणार आहे.

वर्धा जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशावरून महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्याची आखणी करण्यात आली आहे. विदर्भात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेत ११ जणांची समिती तयार करण्यात आली आहे. यात काँग्रेसचे विदर्भातील आमदार आणि नेते असणार आहेत. माजी मंत्री वसंतराव पुरके, आमदार रणजित कांबळे, अमर काळे, वीरेंद्र जगताप, सुनील केदार, राहुल बोद्रे, राजेंद्र मुळक, अमित झनक तसेच अतुल लोंढे सह नतिकोद्दीन खतीब यांचा समितीत समावेश असणार आहे. ही समिती सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेत दुष्काळी भागाची पाहणी करणार आहे. यात १३ मे पासून दुष्काळ दौऱ्याची बुलडाणा येथून सुरुवात होणार आहे. पश्चिम विदर्भातून सुरुवात होत पूर्व विदर्भात या दुष्काळ दौऱ्याचा शेवट होणार आहे.

असा असेल दौरा

नेते दुष्काळी भागात जाऊन पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्न जाणून घेतील. तसेच या दौऱ्यात दुष्काळ किंवा यामुळे रोजगार गेले का, हे जाणून घेण्याच्या सूचना काँग्रेस समितीकडून देण्यात आल्या आहेत. तसेच रात्री मुक्कामी राहून गावातील लोकांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचे काम केले जाणार आहे. शिवाय जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन उपाययोजनांची महिती घेणार असल्याचे बोलले जात आहे.

हा दौरा जरी दुष्काळी असला तरी येत्या विधानसभेची नांदी असणार आहे. त्यामुळे सरकारला धारेवर धरण्याचा पुरेपूर प्रयत्न या दुष्काळ दौऱ्यातून होणार आहे. भाजप सरकारवर निशाणा साधत विदर्भासाठी मुख्यमंत्री अपयशी ठरल्याचे सांगत कामावर टीका केली जाणार आहे. शिवाय जनतेतील नाराजी कॅश करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे.

Intro:यात काँग्रेस नेत्याचे फोटो किंवा विडिओ वापरु शकतो.(अशोकराव चव्हाण, विजय वडेट्टीवार).
एक दुष्काळ सदृश्य व्हिजवल फाईल सोबत जोडली आहे.

काँग्रेसचा विदर्भात दुष्काळ दौरा, बुलढाण्यातून होणार सुरवात

यंदा पर्यजन्यमान कमी झाल्याने विदर्भातील अनेक भागात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यातच विदर्भात तापमानाने उचांक गाठला आहे. विदर्भाचे सध्या 45 अंशाचा घरात तापमान असताना पिण्याकग्या पाण्यासाठी शोधा शोध करावी लागत आहे. ही काँग्रेससाठी भाजप सरकारला दुष्काळाच्या नावावर कोंडीत पकडण्यासाठी संधी असणार आहे. पश्चिम विदर्भातील बुलढण्यातून 13 मे पासून दुष्काळ दौरा सुरू होणार आहे.

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशावरून महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्याची आखणी करण्यात आली आहे. विदर्भात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेत 11 जणांची समिती तयार करण्यात आली आहे. यात काँग्रेसचे विदर्भातील आमदार आणि नेते असणार आहे. माजी मंत्री वसंतराव पुरके, आमदार रणजित कांबळे, अमर काळे, वीरेंद्र जगताप, सुनील केदार, राहुल बोद्रे, राजेंद्र मुळक, अमित झनक तसेच अतुल लोंढे सह नतिकोद्दीन खतीब यांचा समितीत समावेश असणार आहे.

समिती सरकारकडून सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती घेत दुष्काळी भागाची पाहणी करणार आहे. यात 13 मे पासून दुष्काळ दौऱ्याची बुलढाणा येथून सुरवात होणार आहे. पश्चिम विदर्भातून सुरवात होत पूर्व विदर्भात या दुष्काळ दौऱ्याचा शेवट होणार आहे.

दौऱ्यात काय होणार......
नेत्यांनी दुष्काळी भागात जाऊन पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, जनावाऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न जाणून घेतले जातील. तसेच या दौऱ्यात दुष्काळ किंवा यामुळे रोजगार गेले का हे जाणून घेण्याचा सूचना काँग्रेस कमेटीकडू करण्यात आल्या आहे. तसेच रात्री मुक्कामी राहून गावातील परिस्थिती जाणून घेई लोकांशी चर्चा करून प्रश्न जाणून घेण्याचे काम केले जाणार आहे. तसेच जिल्हाधिकारी याच्याशी चर्चा करुन उपाययोजनांची महिती घेणार असल्याचे बोलाले जात आहे.

हा दौरा जरी दुष्काळी असला तरी येत्या विधानसभेची नांदी असणार आहे. त्यामुळे सरकारला धारेवर धरण्याचा पुरेपूर प्रयत्न या दुष्काळ दौऱ्यातून होणार आहे. भाजप सरकारवर निशाणा साधत विदर्भासाठी मुख्यमंत्री अपयशी ठरल्याचे सांगत कामावर टीका केली जाणार आहे. शिवाय जनतेतील नाराजी कॅश करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार यामाँध्यमातून होणार आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.