मुंबई - राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. मात्र राज्य सरकार शेतकऱ्यांना योग्य ती मदत करेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते आज वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर या गावात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेत होते.
लोकांना वाचविण्याचे काम यंत्रणांनी केले - अतिवष्टीने अनेक शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यातही अनेक जण पुरात अडकले होते. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये लोकांना वाचविण्याचे काम यंत्रणांनी केल्याचे आज देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आजही यंत्रणा पूरग्रस्त भागात काम करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
-
📍समुद्रपूर, वर्धा.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
अतिशय कठीण परिस्थितीमध्ये लोकांना वाचविण्याचे काम यंत्रणांनी केले आहे आणि अजूनही ते करीत आहेत.
दुबार पेरणी सुद्धा संकटात आली आहे. शेतकऱ्यांना योग्य मदत राज्य सरकारतर्फे दिली जाईल. माध्यमांशी संवाद...#Wardha #floods #Maharashtra #rescueoperation pic.twitter.com/RNW8VkCvPr
">📍समुद्रपूर, वर्धा.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 19, 2022
अतिशय कठीण परिस्थितीमध्ये लोकांना वाचविण्याचे काम यंत्रणांनी केले आहे आणि अजूनही ते करीत आहेत.
दुबार पेरणी सुद्धा संकटात आली आहे. शेतकऱ्यांना योग्य मदत राज्य सरकारतर्फे दिली जाईल. माध्यमांशी संवाद...#Wardha #floods #Maharashtra #rescueoperation pic.twitter.com/RNW8VkCvPr📍समुद्रपूर, वर्धा.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 19, 2022
अतिशय कठीण परिस्थितीमध्ये लोकांना वाचविण्याचे काम यंत्रणांनी केले आहे आणि अजूनही ते करीत आहेत.
दुबार पेरणी सुद्धा संकटात आली आहे. शेतकऱ्यांना योग्य मदत राज्य सरकारतर्फे दिली जाईल. माध्यमांशी संवाद...#Wardha #floods #Maharashtra #rescueoperation pic.twitter.com/RNW8VkCvPr
दुबार पेरणी सुद्धा संकटात - वर्धा जिल्ह्यासह चंद्रपूर, अमरावती, अकोल्यासह विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांची दुबार पेरणीही संकटात सापडली आहे. दुबार पेरणी संकटात सापडल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळले आहे. आज समुद्रपूर परिसरात देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीही संकटात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली जाईल असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.