वर्धा - देशावर कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे अन्नदाता मात्र अवकाळी पाऊस आणि गारपीटीच्या चक्रव्युहात अडकला आहे. कोरोनामुळे शेतातील पीक काढायला मजूर सापडत नाहीत. त्यात आता अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्याला दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. आज (रविवारी) जिल्ह्यातील कारंजा आष्टी तालुक्यात झालेल्या गारपीट आणि पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कारंजा आणि आष्टी तालुक्यातील काही भागाला तब्बल 15 ते 20 मिनिटे गारपीटीने झोडपून काढले. यामुळे गहू, हरभरा तसेच मजुरांअभावी शेतात अजूनही शिल्लक असलेला कापूस भिजला आहे. सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह होणारा पाऊस हा शेतकऱ्यांच्या चिंतेत रोज भर घालत आहे. यासह आर्वी, वर्धा शहरासह काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. यंदाच्या महिन्यात सततचा पाऊस हा शेतकऱ्यांच्या जिवावर उठला आहे.
अनेकांच्या शेतात गहू, हरभरा हे पीक काढायचे आहे. गहू काढायला मजूर सापडत नाहीत. हरभरा काढला असला, तरी अजून घरापर्यंत पोहोचवलेला नाही. कोरोनाच्या भीतीचे सावट असल्याने शेतात मजूर जायला तयार होत नाहीत.
कोरोनाच्या संकटात गारपीट आणि अवकाळीची भर
कारंजा आणि आष्टी तालुक्यातील काही भागाला तब्बल 15 ते 20 मिनिटे गारपीटीने झोडपून काढले. यामुळे गहू, हरभरा तसेच मजुरांअभावी शेतात अजूनही शिल्लक असलेला कापूस भिजला आहे. सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह होणारा पाऊस हा शेतकऱ्यांच्या चिंतेत रोज भर घालत आहे.