वर्धा - शहरातील बाजारपेठ चौकातील श्रीराम मंदिर संस्थानातर्फे 'रामनवमी' आणि नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेले 'पाडवा पहाट' कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय मंदिर संस्थानाच्या वतीने घेण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत ट्रस्टतर्फे ही माहिती देण्यात आली.
श्रीराम नवमीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी तयारी सुद्धा करण्यात आली. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला बाईक रॅली काढली जाते. मंदिरात होणारे पठण, कीर्तनाच्या कार्यक्रमांना लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात. मात्र, यंदा कोरोना संसर्गाच्या सावटाखाली खबरदारी लोकांनी एकत्र येणे टाळण्यासाठी या उपाययोजना केल्या जात आहेत.
दरवर्षी पाडवा पहाटला असता हजारोच्या संख्येने नागरिक
'पाडवा पहाट' हा कार्यक्रम श्रीराम मंदिरच्या वतीने मागील 12 वर्षांपासून गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर घेतला जात असतो. या कार्यक्रमासाठी सेलिब्रेटींना बोलावले जाते. यंदाही आर्या आंबेकर यांना बोलवण्यात आले होते. मंदिराच्या वतीने निमंत्रण पत्रिका आणि माहिती पत्रक सुद्धा वाटले होते. मात्र, आता हा कार्यक्रम रद्द झाला आहे.
कोरोनाविषयी जनजागृती करणार
आता हा कार्यक्रम रद्द झाला असला तरी मंदिर प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात संख्याबळ आहे. यांच्या माध्यमातून प्रत्येकी दोन लोक हे घरोघरी जाऊन कोरोना विषयी जनजागृती करणार असल्याचे सुद्धा सांगण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी यांना भेटून यावर चर्चा करणार असल्याचे मंदिरराचे पदाधिकारी संजीव लाभे यांनी ईटीव्ही भारताला सांगितले.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : डहाणूतील प्रसिद्ध 'महालक्ष्मी यात्रा' रद्द
हेही वाचा - #COVID१९ : आता एका सीटवर एकच प्रवासी... एसटी महामंडळाचा निर्णय