ETV Bharat / state

काँग्रेसचा कृषी कायद्याला विरोध, 31 ऑक्टोबरला सेवाग्रामध्ये सत्याग्रह आंदोलन - congress in sevagram ashram

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला देशभरात विरोध होत आहे. काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरात किसान अधिकार दिवस म्हणून सत्याग्रह आंदोलन होणार आहे. 31 ऑक्टोबरला वर्ध्याच्या सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमाबाहेर या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सेवाग्राम
सेवाग्राम
author img

By

Published : Oct 27, 2020, 11:17 PM IST

वर्धा- केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला देशभरात विरोध होत आहे. काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरात किसान अधिकार दिवस म्हणून सत्याग्रह आंदोलन होणार आहे. 31 ऑक्टोबरला वर्ध्याच्या सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमाबाहेर या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित राहणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

माहिती देताना मुख्य कार्यक्रम संयोजक विशाल चौधरी

वर्ध्यात प्रदेशाध्यक्षांसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती

सत्याग्रह बापूंच्या आश्रमासमोर असल्याने त्यास विशेष महत्व असणार आहे. या आंदोलनाचे नेतृत स्वतः प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात करणार असल्याचे सांगितले जात आहे. यासह त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रभारी एच.के पाटील, विदर्भातील मंत्री नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, सुनील केदार यासह जिल्ह्यातील माजी राज्य मंत्री आमदार रणजीत कांबळे, माजी आमदार अमर काळे यासह आणखी पदाधिकारी उपास्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

कोविड नियमांचे पालन करून होणार सत्याग्रह?

कोरोना काळ असल्याने आंदोलनात सामाजिक अंतर आणि मास्क यासह शासकीय नियमांच्या अटीशर्थींचे पालन करून सत्याग्रह करण्याच्या सूचना आहेत.

हेही वाचा- देवी विसर्जनादरम्यान तलावात पडल्याने एकाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.