वर्धा - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याला देशभरात विरोध होत आहे. आज इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. याचे औचित्य साधून काँग्रेस सेवाग्राम येथे राज्यव्यापी आंदोलनाला सुरवात करणार आहे.
या आंदोलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी आंदोलनाला सुरवात होईल. हे सत्याग्रह आंदोलन महाराष्ट्रभर जिल्हास्तरावर देखील होणार आहे. वर्ध्याच्या सेवाग्राम येथे महात्मा गांधींच्या आश्रमाबाहेर आंदोलन होईल. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह एच के पाटील, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बापू कुटीच्या बाहेर प्रार्थना केली जाणार
सेवाग्राम आश्रमात सामाजिक अंतर ठेवून बापू कुटीचे दर्शन घेतले जाणार आहे. बापू कुटीच्याबाहेर प्रार्थना होईल. त्यानंतर काँग्रेसचे नेतेमंडळी सत्याग्रह आंदोलनाला सुरवात करतील. तसेच आंदोलनात इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. भजन कीर्तनासह दुपारी 3 वाजेपर्यंत हा कार्यक्रम असेल.
हेही वाचा-कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक क्षमता १५०० मे. टन इतकी वाढवून द्या; मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र
हेही वाचा- पंजाब नंतर राजस्थान सरकार केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात प्रस्ताव आणणार