ETV Bharat / state

वर्ध्याच्या रामनगर प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी करा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना - containment area in wardha news

रामनगर येथे मंगळवारी 59 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यानंतर या भागाला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. आज जिल्हाधिकारी यांनी या भागातील सर्व नागरिकांचीसुद्धा आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश दिलेत. तसेच, त्यांच्याशी संवाद साधून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित होतोय की नाही याबाबत विचारपूसही केली.

रामनगरच्या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी करा

author img

By

Published : Jun 11, 2020, 9:39 PM IST

कोरोना
कोरोना प्रतिबंधित परिसराची पाहणी करताना जिल्हाधिकारी

वर्धा - शहरातील रामनगर भागातील व्यक्ती कोरोनाबाधित रुग्ण आढल्यामुळे काही भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आज(गुरुवार) प्रतिबंधित क्षेत्राला भेट देऊन येथील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या.

रामनगर येथे मंगळवारी 59 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यानंतर या भागाला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. या भागातील हाय रिस्कमधील व्यक्तींचे स्त्राव नमुने कोरोना तपासणीला पाठविण्यात आले होते. त्या आठही व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज जिल्हाधिकारी यांनी या भागातील सर्व नागरिकांचीसुद्धा आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश दिलेत. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित होतोय की नाही याबाबत विचारपूस केली. तसेच हा भाग आणखी 10 दिवस असाच बंद राहील. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.

नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत यावेळी समाधान व्यक्त केले. या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत सांगताना त्यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्याच्याही सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, रामनगरचे पोलीस निरीक्षक धनाजी, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. किमया गंधे आणि डॉ. टेकाम उपस्थित होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.