ETV Bharat / state

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते होणार अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे उद्घाटन

वर्धा येथील राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी साहित्‍यनगरीमध्‍ये 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन होत आहे. विदर्भ साहित्‍य संघाच्‍या शताब्‍दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळाच्‍यावतीने हे संमेलन होत आहे. स्‍वावलंबी शिक्षण मंडळाच्या पटांगणात साहित्‍य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून साहित्‍य नगरी सजली आहे.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan
अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन
author img

By

Published : Feb 3, 2023, 7:42 AM IST

वर्धा : दिवसभर या परिसरात अनेक कार्यक्रम होणार आहेत. यात संमेलनाध्‍यक्षांचे भाषण, विविध विषयांवरचे परिसंवाद, निमंत्रितांचे कविसंमेलन, विविध कट्टयांचे उद्घाटन असे कार्यक्रम राहणार आहेत. विविध ठिकाणाहून साहित्यिक, साहित्य रसिक वर्धेत दाखल झाले आहेत. पुढचे तीन दिवस साहित्‍य नगरीत साहित्‍याचा जागर होणार आहे. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष व संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदिप दाते याच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाच्या यशस्वितेसाठी विविध समित्या कार्यरत आहेत. संमेलनाला उत्स्पुर्त प्रतिसाद मिळत आहे.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan
अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन

आज साहित्‍य संमेलनातील कार्यक्रम : सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली आहे. आचार्य विनोबा भावे सभामंडपात सकाळी 10.30 वाजता संमेलनाचे उद्घाटन, दुपारी 2.00 वाजता ‘कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महाराष्‍ट्राची प्रबोधन परंपरा’ विषयावर परिसंवाद पार पडणार आहे. दुपारी 4.30 वाजता संमेलनाध्‍यक्षांचे भाषण पार पडणार आहे. सायं. 5.30 वाजता ‘आम्‍हा लेखकांना काही बोलायचे आहे’ वर परिसंवाद पार पडणार आहे. सायं. 7.00 वाजता ‘ललितेतर साहित्‍याची वाढती लोकप्रिय’वर परिसंवाद, रात्री 8.30 वाजता निमंत्रितांचे कविसंमेलन असणार आहे.

वर्धेकरांचा उस्फुर्त प्रतिसाद : साहित्‍य संमेलनाचे उद्घाटन आचार्य विनोबा भावे सभामंडपातील प्राचार्य राम शेवाळकर व्‍यासपीठावर मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते होणार आहे. समारोप रविवार 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. म. रा. जोशी व प्रकाशक राजीव बर्वे यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्‍याचे शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्‍यक्ष ज्‍येष्‍ठ साहित्यिक न्‍या. नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्‍याक्ष ज्‍येष्‍ठ साहित्यिक भारत सासणे, स्‍वागताध्‍यक्ष दत्‍ता मेघे यांच्‍यासह ज्‍येष्‍ठ हिंदी कवी व समीक्षक डॉ. विश्‍वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्‍वास, आमदार डॉ. विश्‍वजीत कदम, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती, डॉ. पी. डी. पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. तत्‍पूर्वी, सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडी निघणार असून अखिल भारतीय महामंडळाच्‍या अध्‍यक्ष प्रा. उषा तांबे यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात येणार आहे.

इतर कार्यक्रम : दुपारी 2.00 वाजता कविकट्ट्याचे आयोजन करण्यात आले आहेत. त्याचे उद्घाटन प्रा. देविदास सोटे करणार आहेत. दुपारी 2.00 वाजता गझल कट्टयाचे उद्घाटन कविवर्य सुरेश भट करणार आहेत. दुपारी 4.00 वाजता ग.त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंचचे उद्घाटन करणार आहेत. मनोहर म्‍हैसाळकर सभामंडपात दुपारी 2.00 वाजता कथाक‍थन पार पडेल. सायंकाळी 6.30 वाजता ‘विदर्भातील बोलीभाषा’ वर परिसंवाद, सायंकाळी 8.00 वाजता ‘मृदगंध वैदर्भीय काव्‍यप्रतिभेचा’ विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मुलाखत व मुक्त संवाद : शुक्रवार, 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांची प्रकट मुलाखत मुक्ता पुणतांबेकर, विनोद सिरसाट व विवेक सावंत घेतली. याच दिवशी सायंकाळी 5.30 वाजता प्रसिद्ध मराठी सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे व कवी 'सौमित्र' किशोर कदम यांचा सहभाग असलेला 'मुक्त संवाद' हा कार्यक्रम होणार आहे. वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहूल कर्डिले हे अध्यक्षस्थानी राहणार असून संवादक बालाजी सुतार राहतील.

परिसंवाद आणि परिचर्चा : या संमेलनात मनोहर म्हैसाळकर सभामंडप व आचार्य विनोबा भावे सभामंडपामध्ये तीन दिवस एकूण तेरा विषयांवर परिसंवाद होणार आहे. त्यात कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा, आम्हा लेखकांना काही बोलायचे आहे, ललितेत्तर साहित्याची वाढती लोकप्रियता, विदर्भातील बोलीभाषा, भारतीय व जागतिक साहित्यविश्वात मराठीची ध्वजा फडकवणारे अनुवादक, कृषिजीवनातील अस्थिरता, प्रक्षोभ आणि मराठी लेखक, मराठी साहित्यातील उद्यम व अर्थविषयक लेखन, ग्रंथालय चळवळीचे यशापयश, वैदर्भीय वाडमयीन परंपरा, गांधीजी ते विनोबाजी:वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून, वाचन पर्यायाच्या पसा-यात गोंधळलेले वाचक, वंचित समाजाच्या साहित्यातील लोकशाहीचे चित्रण या विषयांचा समावेश आहे. स्त्री-पुरुष तुलना (ताराबाई शिंदे) विषयावर परिचर्चा होणार असून संमेलनाध्यक्षांचे भाषण व त्यावर चर्चादेखील होईल.

कवितेचा जागर व इतर कार्यक्रम : निमंत्रितांचे पहिले कविसंमेलन 3 तारखेला रात्री 8.30 जयराम खेडेकर यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. रात्री 8 8 वाजता मृद्गंध वैदर्भीय काव्यप्रतिभेचा' हा विदर्भ साहित्य संघाची प्रस्तुती असलेला कार्यक्रम होणार आहे. दुसरे कविसंमेलन 4 तारखेला रात्री 8.30 वाजता श्याम माधव धोंड यांच्या अध्यक्षतेत होईल. शिवाय, गझलकट्टा, कविकट्ट्याचेदेखील आयोजन करण्यात आले असून या महाराष्ट्रभरातून आलेले सुमारे 900 कवी तीन दिवस कवितेचा जागर करणार आहेत. 3 तारखेला दुपारी 2 वाजता डॉ. सुनंदा गोरे यांच्या अध्यक्षतेत कथाकथन होईल. रंगदृष्टी प्रस्तुत 'गावकथा' हा एकांक, युवक बिरादरीचा 'तीर्थधारा' तसेच, श्याम गुंडावार व श्याम सरोदे यांचा 'अभंगधारा' असे सांस्कृतिक कार्यक्रमदेखील संमलेनादरम्यान होणार आहेत. ग्रंथप्रदर्शन व वाचन मंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथनगरीत भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून यात एकुण 290 ग्रंथदालने राहणार आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, गोवा येथील राजहंस, मॅजेस्टिक, मौज, पॉप्युलर, मेहता, रोहन, दिलीपराज, साधना इत्यादी प्रकाशनांची पुस्तके येथे विक्रीसाठी उपलब्ध राहतील. याशिवाय, वाचन मंच, बालसाहित्य मंच, बसोली ग्रुप व स्कुल ऑफ स्कॉलर्सतर्फे चित्रकाव्य प्रदर्शन इत्यादी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी मराठी रसिक, वाचकांना मिळणार आहे.

हेही वाचा : CM Shinde On Sri Sri RaviShankar: आम्ही गुवाहाटीला गेलो होतो, तेव्हा श्री श्री रविशंकर गुरुजींनी फोनवर आशीर्वाद दिला- मुख्यमंत्री शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.