ETV Bharat / state

सेवाग्रामच्या पावन भूमीतील कार्यांवर महात्मा गांधींची छाप - राष्ट्रपती - राज्यपाल सी. विद्यासागर राव

सेवाग्राम येथील महात्मा गांधी इंन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्सच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सविता रामनाथ कोविंद, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष धीरुभाई मेहता, संस्थेचे विश्वस्त पी.एल. तापडीया, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. नितीन गणगने आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपती आणि मान्यवरांच्या हस्ते सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद
author img

By

Published : Aug 17, 2019, 11:47 PM IST

वर्धा - सेवाग्राम आश्रम हे सत्य, अहिंसा, मानवता, मुक्तीचे प्रायोगिक केंद्र आहे. तसेच या आश्रमात स्वछता आणि आरोग्याच्या कामावर बापूंची खोलवर छाप असल्याचे दिसून येते. महात्मा गांधींनी याच ठिकाणाहून कृष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यक्रमला सुरुवात केली होती. तसेच स्वच्छ भारत अभियान आणि हागणदारी मुक्त भारत या अभियानासाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

सेवाग्राम येथील महात्मा गांधी इंन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्सच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सविता रामनाथ कोविंद, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष धीरुभाई मेहता, संस्थेचे विश्वस्त पी.एल. तापडीया, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. नितीन गणगने आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपती आणि मान्यवरांच्या हस्ते सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले.

संस्थेच्या संस्थापिका डॉ. सुशीला नायर यांची आठवण

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे हे १५० वे जयंती वर्ष आहे. ग्रामीण भागात महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारीत पहिले वैद्यकीय महाविद्यालय सेवाग्राम येथे सुरू झाले. या महाविद्यालयाने सुवर्ण महोत्सवी वर्षात वाटचाल केली आहे. सत्य, अहिंसा, सेवा आणि मानवतेची शिकवण देणारी ही भूमी प्रेरणादायी आहे. या निमित्ताने १९६९ पासून सुरुवात केलेल्या संस्थेच्या संस्थापिका डॉ. सुशीला नायर यांची नि:स्वार्थ सेवा आठवण्याची इच्छा आहे. त्या कट्टर गांधीवादी, अविरत स्वातंत्र्य सेनानी आणि दूरदर्शी वैद्यकीय चिकित्सक होत्या. त्याचबरोबर त्या गांधीजीच्या जवळच्या सहकारी होत्या. त्यांनी सेवाग्राम आश्रमात बराच वेळ घालवला. वैद्यकीय महाविद्यालयाने सुवर्णमहोत्सवी टप्पा गाठला. त्यासाठी मी तुम्हाला आणि संपूर्ण भारत आणि जगभरात पसरलेल्या संपूर्ण महात्मा गांधी संस्था परिवाराचे अभिनंदन करतो, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.

राष्ट्रपतींनी संस्थेचा गौरव केला

यावेळी राष्ट्रपती कोविंद यांनी गांधीजींचा जीवनपट आणि देशासाठी त्यांनी केलेल्या त्यागाची आवर्जून आठवण केली. बापू कुटी परिसर हा आजही स्वच्छता आणि आरोग्याच्या सुविधेसाठी विशेष ओळखला जातो. बापूंनी आपले कृष्ठरोग निर्मुलनाचे कार्य याच आश्रमातून सुरू केले. सेवाग्राम, वर्धा आणि विदर्भाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या भूमीत आचार्य विनोबा भावे यांनी भूदान आंदोलनाची तर बाबा आमटे यांनी कृष्ठरोग निर्मुलनासह सामाजिक बदलाची चळवळ उभारली होती. हाच वारसा सेवाग्राम मेडीकल संस्थेने जपला असून एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला असल्याचे सांगून राष्ट्रपतींनी संस्थेने गौरव केला.

पुरात प्राण गमावलेल्या लोकांप्रती व्यक्त केला शोक

त्यांचबरोबर त्यांनी संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील कुटुंबाच्या आरोग्यासाठी राबविण्यात आलेली ग्रामदत्तक योजनेचे कौतूक केले. संस्थेची आरोग्य सेवा ही ग्रामीण आणि शहरी भागातील दरी दूर करण्याचे कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रपती कोविंद यांनी देशात आलेल्या विनाशकारी पुरात प्राण गमावलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त केला. सोबतच त्यांनी पूरग्रस्त भागात मदत सेवा पोहोचविणारे केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारचे कौतूक केले. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या अनेक कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या.

Intro:सेवग्रामच्या पावन भूमीत स्वच्छता आणि आरोग्याच्या कार्यावर महात्मा गांधींची छाप- राष्ट्रपती

वर्धा - सेवाग्राम आश्रम हे सत्य अहिंसा मानवता मुक्ती याचे महात्माचे प्रायोगिक केंद्र आहे. तसेच स्वछता आणि आरोग्याच्या कामावर बापुची छाप खोलवर असल्याचे दिसून येते. महात्मा गांधींनी याच ठिकाणाहून कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यक्रमला सुरवात केली होती. तसेच ते स्वच्छतेचे कामाचे पाहिले संशोधक राहिले. त्याच्यापासून स्वच्छ भारत अभियान शौच मुक्त भारत अभियानासाठी प्रेरणा देते.

सेवाग्राम येथील महात्मा गांधी इंन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्सच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सविता रामनाथ कोविंद, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष धिरुभाई मेहता, संस्थेचे विश्वस्त पी.एल. तापडीया, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन गणगने आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपती आणि मान्यवरांच्या हस्ते सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे हे 150 वे जयंती वर्ष आहे. ग्रामीण भागात महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारीत पहिले वैद्यकीय महाविद्यालय सेवाग्राम येथे सुरू झाले. या महाविद्यालयाने सुवर्ण महोत्सवी वर्षात वाटचाल केली आहे. सत्य, अहिंसा, सेवा आणि मानवतेची शिकवण देणारी ही भूमी प्रेरणादायी आहे. या निमित्ताने 1969 पासून सुरवात केलेल्या संस्थेच्या संस्थापक डॉ. सुशीला नायर यांची नि: स्वार्थ सेवा आठवण्याची इच्छा आहे. कट्टर गांधीवादी, अविरत स्वातंत्र्यसेनानी आणि दूरदर्शी वैद्यकीय चिकित्सक त्या होत्या. गांधीजींची जवळची सहकारी होती आणि सेवाग्राम आश्रमात त्यांनी बराच वेळ घालवला. सुवर्णमहोत्सवी महत्त्वाचा टप्पा गाठण्यासाठी मी तुम्हाला आणि संपूर्ण भारत आणि जगभरात पसरलेल्या संपूर्ण महात्मा गांधी संस्था परिवाराचे अभिनंदन करतो.

गांधींजीचा जीवनपट आणि देशासाठी त्यांनी केलेला त्याग याची आवर्जुन आठवण झाली. बापुकुटी परिसर हा आजही स्वच्छता आणि आरोग्याच्या सुविधेसाठी विशेष ओळखला जातो. बापुंनी आपले कुष्टरोग निर्मुलनाचे कार्य याच आश्रमातून सुरू केले. सेवाग्राम, वर्धा आणि विदर्भाला एक ऐतिहासिक पार्श्वभुमी आहे. या भुमीत आचार्य विनोबा भावे यांनी भुदान आंदोलनाची तर बाबा आमटे यांनी कुष्ठरोग निर्मुलनासह सामाजिक बदलाची चळवळ उभारली. हाच वारसा सेवाग्राम मेडीकल संस्थेने जपला असून एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला असल्याचे गौरद्वार राष्ट्रपतींनी काढले.

येथील डॉक्टरांनी समाजाच्या उत्थानासाठी आणि त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी महत्वाची भुमिका बजावली आहे. संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील कुटुंबाच्या आरोग्यासाठी राबविण्यात आलेली ग्रामदत्तक योजना ही कौतुकास्पद आहे. या संस्थेची आरोग्य सेवा ही ग्रामीण आणि शहरी भागातील दरी दूर करण्याचे कार्य निरंतर करीत आहे. सोबतच संस्थेची नाविण्यपूर्ण ग्रामीण आरोग्य विमा योजना अनेक कुटुंबाना दिलासा देणारी आहे.

महामहिम राष्ट्रपती यांनी भाषणाची सुरवात महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात आलेल्या विनाशकारी पूरात गमावलेल्या अनमोल जीवनाबद्दल मनापासून शोक व्यक्त व्यक्त करत केली. या ज्यांनी जवळचे आणि प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबरोबर माझी प्रार्थना आहे. या प्रलयात प्रभावित लोक लवकरच सामान्य जीवनात परत येऊ शकतील. पूरग्रस्त भागात मदत मिळाली म्हणून मी केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारच्या सेवांचे कौतुक करतो. मला सांगण्यात आले आहे की आपल्या संस्थेने विशेषत: जवळपासच्या राज्यांमध्ये पूरमुक्तीच्या कामात हातभार लावला आहे.

पुरात गमावलेल्या लोकांप्रति शोक व्यक्त करतो.....
काही दिवसांपूर्वी देशासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंब बाधित झाले आहेत. या सर्वांप्रती संवेदना व्यक्त करून राष्ट्रपती म्हणाले की, त्यांचे आयुष्य लवकर पुर्वपदावर येईल, अशी आशादायी प्रार्थना करतो. केंद्र आणि राज्य शासन पूरपिडीतांच्या मदतीसाठी धावून आले असून समाजातील नागरिकांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वयंप्रेरणेने पुढे आले त्यांचे कौतून करतो. तसेच या संस्थेनेदेखील पूरग्रस्तांच्या आरोग्य सुविधेसाठी पुढाकार घेतला आहे.Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.