वर्धा - जिल्ह्यातील धाम प्रकल्प महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पातून वर्धा शहर, एमआयडीसी, रेल्वे आदींना पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी नदीपात्रात पाणी सोडले जाते. नदीपात्रात पाणी सोडल्याने परिसरातील गावांना पाणी मिळते. पण, आता भूमिगत पाईपलाईन टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्याने नदीकाठावरच्या गावकऱ्यांची झोप उडाली आहे. या योजनेच्या विरोधात जिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
गावकऱ्यांचा भूमिगत पाईपलाईनला विरोध का...
नदीपात्र कोरडे झाल्यास जवळपास १५ ते २० गावांना त्याची झळ बसू शकते.
प्रकल्पातून नदी पात्रात सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे पाणी पुरवठा गावातील विहिरींना पाणी पातळीत वाढ होऊन फायदा होतो. नदीपात्रात असलेल्या पाण्यावर जनावरे, पक्ष्यांचीही तहान भागते. पण, भूमिगत पाईपलाईन टाकल्यास या भागात पाण्यासाठी हाहाकार उडू शकतो. त्यामुळे ही पाईपलाईन न टाकता पूर्वीप्रमाणेच नदीपात्रातूनच पाणी सोडावं, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.