ETV Bharat / state

वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त मराठा सेवा संघाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन.

author img

By

Published : Feb 19, 2019, 3:46 PM IST

वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात

वर्धा - शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. म्हाडा कॉलनी परिसरातून भगवा निळा हिरवा रंगाचे झेंडे दाखवत रॅलीला सुरवात करण्यात आली.

मराठा सेवा संघातर्फे सुरवातीला पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जय जिजाऊ जय शिवरायचा नारा देत भगव्या, निळ्या आणि हिरव्या रंगाच्या पताका हातात घेत जय शिवरायचा नारा देत संपूर्ण शहरात बाईक रॅलीला सुरवात झाली. आर्वी नाका परीसरातून बॅचलर रोड, रेल्वे स्थानक, बजाज चौक मार्गे ही रॅली शिवाजी चौकात पोहचली.
undefined

चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्य जय्यत तयारी करण्यात आली होती. पुतळ्याला सकाळपासून अनेकानी माल्यार्पण करत अभिवादन केले. यावेळी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, मराठा सेवा संघ, क्षत्रिय मराठा सेवा संघ आणि शहरातून अनेक संघटनांनी रॅली काढत चौकातील प्रतिमेला अभिवादन केले. या कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष राजाभाऊ वानखडे, सचिव सुधीर गिर्हे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे नीरज बुटे यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला होता.

Intro:वर्धा
वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी

वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. म्हाडा कॉलनी परिसरातून भगवा निळा हिरवा रंगाच्या झेंडे दाखवत रॅलीला सुरवात करण्यात आली..

मराठा सेवा संघाच्या सुरवातीला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जय जिजाऊ जय शिवरायचा नारा देत भगव्या निळ्या हिरवा रंगाच्या पताका हातात घेत छत्रपती जय शिवरायचा नारा देत संपूर्ण शहरात शिवगर्जना करत बाईक रॅलीला सुरवात झाली. आर्वी नाका परीसरातुन होत बॅचलर रोड, रेल्वे स्टेशन बजाज चौक होत शिवाजी चौकात पोहचली.

चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्य जय्यत तयारी करण्यात आली. पुतळ्याला सकाळपासून अनेकानी माल्यार्पण करत अभिवादन केले. यावेळी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, मराठा सेवा संघ, क्षत्रिय मराठा सेवा संघ तसेच शहरातून अनेक संघटनांनी रॅली काढत चौकातील प्रतिमेला माल्यार्पण करत अभिवादन केले.

मराठा सेवा संघाचे अध्यक्ष राजाभाऊ वानखडे, सचिव सुधीर गिर्हे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे नीरज बुटे सह अनेकांनी सहभाग यात नोंदवला.

Body:पराग ढोबळे,वर्धा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.