वर्धा - नागपूर-तुळजापूर या महामार्गाचे काम उत्कृष्ट झाले आहे. मात्र कंत्राटदारांने या महामार्गावर झाडे लावले नाहीत, म्हणून त्यांचे बिल रोखण्यास सांगितले. जेव्हा बिल रोखण्यात आले तेव्हा 80 हजार खड्डे खोदण्यात आलेस, परंतु, आता त्यात एकही झाड लावण्यात आले नाही, त्यामुळे रस्त्याचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉनवर खासदार रामदास तडस यांनी लक्ष ठेवावे, अशा सूचना देत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी डीबीएल कंपनीला चांगलेच धारेवर धरले. आपण कंत्राटदाराकडून पैसे घेत नाहीत, त्यामुळे जर तो झाडे लावत नसेल तर त्याची 'ठुकाई' करू, असा सज्जड इशाराही नितीन गडकरी यांनी दिला.
आपण कंत्राटदाराकडून पैसे घेत नाही; झाडे न लावल्यास ठोकून काढू - नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर-हैदराबाद महामार्ग सातवर हिंगणघाट येथील नांदगाव चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण पार पडले. या सोहळ्यावेळी बोलताना गडकरी यांनी महामार्गावर झाडे लावण्यास टाळाटाळ केल्यास कारवाईचा बडगा उगरण्याचा इशारा कंत्राटदारास दिला आहे.