वर्धा - वर्धा नगर परिषदेत मागील काही महिन्यांपासून मारहाणीच्या घटनांत वाढ झाली आहे. वर्धा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याला नगरसेवकाकडून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. शेख नौशाद शेख रज्जाक असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे.
वर्धा नगर परिषदेच्या यापूर्वीही मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आजही आणखी एका मारहाणीच्या घटनेने खळबळ उडाली. शराहतील प्रभाग 6 मध्ये पाणी पुरवठा पाईपलाईनमध्ये गळती असल्याने ते दुरुस्त करण्याचे काम नगरसेवक यांनी सांगितले. चार दिवस लोटूनही काम न झाल्याने संतापले. यात आज नगर परिषद कार्यालयात नगर सेवक शेख नौशाद शेख रज्जाक आणि पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी नंदकिशोर मेहरकुटे यांच्यात वाद झाला. यावेळी नगरसेवकांनी हात उचलत नगर परिषदेच्या आवारात मारहाण केली.
यावेळी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नगर परिषदेच्या कार्यलयासमोर धरणे देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या घटनेचा निषेधही केला. शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगसेवकाची नगर परिषद कर्मचाऱ्याला मारहाण, गुन्हा दाखल
वर्धा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याला नगरसेवकाकडून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. शेख नौशाद शेख रज्जाक असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकांचे नाव आहे.