वर्धा : 'आखरी निवास' हे महात्मा गांधी यांचं वर्ध्यातील शेवटचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. पावसाळा ऋतू काहीच दिवसांवर आहे. आश्रमातील सर्व कुटी या पारंपारिक पद्धतीने जपल्या गेल्या आहेत. आश्रमातील सर्वच वास्तु या माती, लाकूड आणि कवेलूने बनलेले असल्यामुळे पावसाळ्यात या वास्तूंना हानी पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूंना जपणे, संरक्षण करणे फार गरजेचे आहे.
बापूंच्या कुटीचे रक्षण : त्यामुळे आश्रमातील कर्मचारी सध्या या आखरी निवासच्या छतावर लाकडी फाटे आणि कावेलु रचण्याचे काम करत आहेत. बापूंच्या विचाराप्रमाणे आजही त्यांच्या कुटीचे रक्षण केले जाते. वर्धाच्या सेवाग्राम आश्रमाला संपूर्ण देशात मानाचे स्थान आहे. याच आश्रमामध्ये राहून महात्मा गांधीजींनी भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई सुद्धा लढली होती. याच आश्रमामध्ये महात्मा गांधीजी यांचे आजही आपल्याला साहित्य पाहायला मिळते. प्रत्येक दिवशी दरवर्षी भारतातून असंख्य ठिकाणाहून अनेक नागरिक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळे या आश्रमाला एक अनोखा दर्जा प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे मंत्री व्हीआयपी तथा इतर अतिशय महत्त्वाचे व्यक्ती या आश्रमाला भेट देण्यासाठी येत असतात, कोणत्याही राजकीय निवडणुकी संदर्भात आश्रमातूनच नारळ फोडून तिची प्रचाराला सुरुवात केली जाते, त्यामुळे या आश्रमाला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
सेवाग्राम आश्रमाला सुरक्षा कवच : या आश्रमाच्या प्रत्येक वस्तूचे जतन करण्यासाठी सेवाग्राम आश्रम समिती ही कठोर परिश्रम घेत असते. त्याचाच एक भाग म्हणून आश्रमाची दागडूजी प्रत्येक वर्षी केली जाते. जेणेकरून पावसाळ्यामध्ये आश्रमाच्या कोणत्याही घराला हानी पोहोचू नये, ते व्यवस्थित राहावे यासाठी प्रत्येक वर्षी त्याची विशेष काळजी घेतल्या जाते. तीच काळजी यावर्षी सुद्धा घेतली जात असून सेवाग्राम आश्रमाला आता सुरक्षा कवच दिल्या जात आहे.
पावसाळ्यात विशेष खबरदारी : सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधींच्या अनेक वस्तू आजही आपल्याला पाहायला मिळतात. त्या अगदी सुखरूप व सुरक्षित ठेवल्या गेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या पिढीला महात्मा गांधीजींच्या प्रत्येक गोष्टीची व वस्तूची माहिती असावी, यासाठी या आश्रमाचे व्यवस्थापन आजही मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे येथील आश्रमाला पावसाळ्यात पाण्याच्या माऱ्यापासून वाचविण्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था केली जाते.
हेही वाचा :