ETV Bharat / state

पुरात बैलगाडी अडकल्याने एका बैलासह गायीचा मृत्यू

नाला ओलांडून शेताकडे जाताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोन जनावरे वाहून गेल्याची घटना वर्धा येथे घडली. प्रसंगावधान राखत सालगडी सुभाष जुगनाके याने पुराच्या प्रवाहात पोहून स्वत:चा जीव वाचवला.

author img

By

Published : Aug 10, 2019, 10:02 PM IST

पुरात बैलगाडी अडकल्याने एका बैलासह गायीचा मृत्यू

वर्धा - गावालगतच्या नाल्यातून बैलगाडीने जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोन जनावरे वाहून गेल्याची घटना घडली. ही घटना समुद्रपूर तालुक्यातील विकणी (जसापूर) शिवारात घडली. प्रसंगावधान राखत सालगडी सुभाष जुगनाके याने पुराच्या प्रवाहात पोहून स्वत:चा जीव वाचवला. गावकाऱ्यांच्या मदतीने एका बैलाला वाचवण्यात जुगनाके यांना यश आले.

पुरात बैलगाडी अडकल्याने एका बैलासह गायीचा मृत्यू
नव्याने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे नाल्याच्या पाण्याचा प्रवाह वाढला होता. रस्ता ओलांडून शेताकडे जाताना जुगनाके यांना पाण्याच्या अंदाज आला नाही. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने बैल बिथरले आणि गाडी पाण्याच्या प्रवाहात वाहत गेली. वाहून गेलेली जनावरे आणि बैलगाडी उमेश डोमाजी घवघवे या शेतकऱ्याची आहेत. सुभाष जुगनाके (वय ३६) हा सालगडी म्हणून कामावर आहे. या घटनेत शेतकऱ्याचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी गजानन घरड, कृषी सहाय्यक देवकते यांनी पंचनामा केला आणि मदतीसाठी तरतूद करत असल्याची माहिती दिली.

Intro:पुरात बैलबंडी अडकल्याने एका बैलासह गायीचा मृत्यू , सुदैवाने सालगडी बचावला

- वर्धा जिल्ह्यातील विकणी (जसापूर) येथिल घटना

वर्धा - गावालगतच्या नाल्यातून बैलबंडीने जात असतांना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने बैलबंडीसह जनावरे वाहून गेल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. ही घटना समुद्रपूर तालुक्यातील विकणी (जसापूर) शिवारात घडली. प्रसंगावधान राखत सालगडी सुभाष जुगनाके यांने पुराच्या प्रवाहातून पोहून एक गावकाऱ्यांनाच्या मदतीने एक बैल वाचवाला. यात एक बैल आणि कारवड मात्र दगावली.

रस्ता ओलांडून शेताकडे जातात पाण्याच्या अंदाज न आल्याने नव्याने जलयुक्त शिवरच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे नाल्याला पाण्याचा प्रवाह वाढला होता. यामुळे बैल बिथरले आणि बंडी पाण्याच्या प्रवाहात वाहत गेली. यावेळी आरडाओरडा करत सुभाष जुगनाकेच्या मदतिला शेतकरी धावले. पाण्यातून एक बैल काढण्यात आला. मात्र एक बैल आणि एक कारवड पाण्याचा प्रवाहामुळे पाणी शरीरात जाऊन फुगल्याने दगावली.

ही जनावरे आणि बैलबंडी उमेश डोमाजी घवघवे नामक शेतकऱ्यांची असून सुभाष जुगनाके (वय ३६) हा सालगडी म्हणून कामावर आहे. यात शेतकऱ्यांचे पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच तलाठी गजानन घरड, कृषी सहाय्यक देवकते यांनी पंचनामा करत मदतीसाठी तरतूद करत असल्याची माहिती दिली.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.