वर्धा - वर्धा गोंदिया, रामटेक, सावनेर, नरखेड आणि पुढे नागपूर होत ब्रह्मपुरी वडसापर्यंत ब्रॉड गेज मेट्रो सुरू होणार आहे. या गाडीच्या माध्यमातून 120 च्या गतीने 35 मिनिटात नागपूरला पोहोचता येणार आहे. यामुळे नागपुरात नोकरी करणाऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. शिवाय यामधील अर्ध्या डब्यात शेतकऱ्यांना दूध भाजीपाला नेता येणार असल्याने त्यांच्यासह वर्धेकरांना याचा चांगला फायदा होणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. वर्ध्यात महायुतीचे उमेदवार आमदार पंकज भोयर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
ब्रॉडगेजसह अनेक वस्तू, त्यांचे स्पेअर पार्ट आदी निर्मितीचा कारखाना सिंदी रेल्वेला उघडण्यात येणार आहे. यामुळे अनेकांना याचा फायदा होणार आहे. महात्मा गांधी आणि विनोबांच्या पावलांनी पावन झालेली भूमी आहे. यामुळे लघु उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून खादी ग्रामोद्योगाला चालना मिळविण्यासाठी 10 पट निधीत वाढ केली आहे. सोलर चरख्याच्या माध्यमातून कापड निर्मितीचे काम हाती घेतले आहे. या कपड्याची निर्यात करून बाजारपेठ मिळणार असल्याचे गडकरी म्हणाले.
हे वाचलं का? - 'गुजरात्यांनी आंदोलन केले की नेतेपद, आम्ही केली की खटले'
मोठ्या प्रमाणात बदल आवश्यक असून बायो इंधनचा माध्यमातून बदल करता येणार आहे. कचऱ्याला भाव आहे. पण साखरेला भाव नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे साखर उत्पादन होणाऱ्या कारखान्यात बदल करून यामधून इंधन तयार केले जाणार आहे. यामुळे पुढील काळात या इंधनाचा वापर करून वाहने रस्त्यावर धावणार आहे. हे स्वस्त असल्याने पेट्रोल डिझेलच्या तुलनेत फायद्याचे ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या मालापासून इंधन तयार झाल्याने त्याचा फायदा होणार आहे. त्यामधून शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेतकरी आत्महत्या करणार असल्याचेही ते म्हणाले. या इथिनॉलची आज 5 हजार कोटींची उलाढाल असून 50 हजार कोटींची उलाढाल केली जाणार आहे. येणाऱ्या पाच वर्षात सहा जिल्हे डिझेलमुक्त कारण्याचा संकल्प घेतला असल्याचे ते म्हणाले.
हे वाचलं का? - 'दोन्ही पैलवान तोलामोलाचे असल्याशिवाय कुस्तीत मजा येत नाही'
कृषी मालावर आधारित उद्योग टाकणार आहे. तसेच बांबूपासून तेल काढून त्याचा वापर विमानाच्या इंधनासाठी करणार असल्याने बांबू लावण्याचे आव्हान शेतकऱ्यांना करणार आहे. बायो सीएनजी निर्मिती करणार आहे. जास्त कॅलरीज व्हॅल्यू असल्याने 1 किलोला 1 लिटर 300 मिली डिझेल म्हणजे 85 रुपयांच्या डिझेलच्या तुलनेत 55 रुपयात मिळणार असल्याने 30 रुपयांचा फायदा होणार आहे.
बायो प्लास्टिक तयार करणार आहे. त्याची 78 तासात माती होते. प्लास्टिक बॉटल बंद झाल्याने याचा फायदा होणार आहे. गरिबी दूर करण्यासाठीचा प्लॅन सरकारने तयार केला असल्याचेही ते म्हणाले.
फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेत विकासाच्या गप्पा मारण्याचे काम काँग्रेसने केले आहे. यामुळे मी स्वप्न पाहतो, दाखवतो, या माध्यमातून पूर्ण करतो, जे पूर्ण करत नाही त्यांना जनता मतदान करत नल्याचेही ते म्हणाले. यावेळी युवकांच्या हाताला रोजगार, शेतकऱ्यांसाठी त्यावर आधारित उद्योग तयार करण्याचे काम सरकार करणार असल्याचेही म्हणाले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे, खासदार रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, विजयराव मुळे, सुरेश वाघमारे, आमदार पंकज भोयर आदी उपस्थित होते.