वर्धा - संसदेत शेतकऱ्याच्या संबंधीत असलेल्या विधेयकामुळे मोठ्या प्रमाणात गदारोळ उठवला जात आहे. पण, हे विधेयक 2019 च्या काँग्रेसध्या जाहीरनाम्यातील आहे. मोदी सरकारच्यावतीने हे विधेयक मंजूर करत शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आणणारे असल्याचे महाराष्ट्र प्रदेश भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुधीर दिवे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
वर्ध्यात आयोजित विधेयकाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या विधेयकाला धरून राजकारण केले जात आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिले असताना ते सरकारमध्ये येऊ शकले नाही म्हणून ते विरोध करत आहेत. या विधेयकाला विरोध करणारे बाजार समितीतील दलाल आहे, व्यापारी आणि काही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी विरोध करत आहेत. या विधेयकातील तरतुदीमुळे स्पर्धा निर्माण होईल. यामुळे त्यांचा एकाधिकार संपणार असल्याने हा विरोध होत आहे. हे विधेयक एक देश एक बाजार....शेती सुधारणेच्या संदर्भात लोकसभेत मंजूर केले. यामुळे शेतकरी जीवनातील नवीन पहाट असेल. आतापर्यंत बाजार समितीतील व्यापारी ठरवेल त्या भावात विकावे लागत होते. आता मात्र या विधेयकामुळे स्वतःच्या मालाची किंमत ठरवून तो कोणालाही माल विकू शकणार आहे. या कायद्याने दिलेले अधिकार प्राप्त होणार आहे. एक देश एक बाजार हे विधेयक नवीन बदल घडवतील, असेही किसान मोर्चाचे सुधीर दिवे यांनी सांगितले.
हेही वाचा - मराठा आरक्षणावर राजकीय स्वार्थासाठी 'कोल्हेकुई' करू नये; जयंत पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला
या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ शिरीष गोडे, प्रदेश सचिव राजेश बकाने, प्रशांत इंगळे तिगावकर, अविनाश देव, सभापाती माधव चंदनखेडे, मिळदं भेंडे तसेच शहर अध्यक्ष पवन परियाल, गंगाधर कोल्हे, भाजपचे सोशल मीडिया संयोजन तुळशीराम पोटदुखे, अभिजित। कुलधरीया, मोहन मोहिते उपस्थित होते.