नागपूर - हिंगणघाट जळीतकांड ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अशा घटना थांबवण्यासाठी कायद्यात बदल करणे गरजे आहे. यासाठी महिला व बाल कल्याण विभागाकडून गृह विभागाला काही सूचना करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. नागपुरात बच्चू कडू यांनी पीडितेची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - LIVE : जळीतकांड प्रकरणाच्या निषेधार्थ वर्धा बंदची हाक
हिंगणघाट जळीतकांडाचे संपुर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. विविध ठिकाणी मोर्चे निघत असून आरोपीच्या फाशीची शिक्षा होत आहे. राज्य सरकारने जलद गतीने आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पीडितेचा संपुर्ण खर्च शासन उचलणार आहे. महिला व बालकल्याण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पीडितेची भेट घेतली. यावेळी त्यांनी महिला व बाल कल्याण विभागाकडून कठोर कायदा करण्यासाठी गृह विभागाला आवश्यक त्या सूचना करण्यात येतील असे सांगितले आहे. तसेच पीडित कुटुंबाच्या आर्थिक पुनर्वसनासाठी आमच्या विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासनही दिले. आपण कितीही आर्थिक मदत केली तरी त्या पीडितेच्या वेदनांची कल्पना आपण करू शकणार नसल्याचे देखील ते म्हणाले.