वर्धा - वर्ध्याच्या रेल्वे स्थानकावर चाकू दाखवून एका प्रवाशाला लुटल्याचा प्रकार 28 मे रोजी पहाटे 6 वाजता घडला. विशेष म्हणजे हा चाकू दाखवणारा ऑटोचालक आणि त्याचा मित्र होता. अकोल्याच्या प्रवाशी असून त्याला हिंगणघाटला जाण्यासाठी बस नसल्याने ज्या ऑटोत रेल्वेस्थानक पर्यंत प्रवास केला, त्याच ऑटोचालकाने मित्रासोबत प्रवाश्याला चाकूचा धाक दाखवून ( Auto rickshaw driver robbed one In wardha ) लुटले. श्रीकांत तिवारी, असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. यामुळे बाहेर गावरून येणारे प्रवाशी असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पोलिसांनी या चोरट्याना धडा शिकवण्याची गरज आहे.
या घटनेनंतर श्रीकांत तिवारी शहर पोलिसांत तक्रार दिली. यात चाकूचा धकावर त्याच्याजवळ असलेली सोन्याची अंगठी आणि रोख असा एकूण 23 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत पोलीस पथकाने शोधमोहीम सुरू केली. यावेळी काही तासातच विक्की सोळंकी ( रा. इतवारा आणि सुरज गिरी वय 19 रा. वाशीम ) याला पोलिसांनी ताब्यात घेत रोख आणि सोन्याचा ऐवज परत मिळवला.
पर्यटनाच्या दृष्टीने धोकादायक - वर्धा शहरात मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकावर बाहेरून हे प्रवासी येत असतात. विशेष म्हणजे सेवाग्राम आश्रमला भेट देण्यासाठी पर्यटकांचाही ये-जा असते. पण, वर्ध्यात पहाटेच्या सुमारास एका ऑटोचालकाने एका इसमाला चाकूचा धाकावर लुटल्याची घटनेने प्रवाश्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. सोबतच एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुन्हेगारामुळे इतर ऑटोचालकही बदनाम होत आहे. त्यामुळे कोणी गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेला ऑटोचालक असल्यास त्याचा बंदोबस्त पोलिसांनी केला नाही तर अशा घटना पुढील काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - ED arrests Delhi Health Minister : दिल्लीमधील आप सरकारला धक्का, ईडीकडून आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अटक