वर्धा- येथील बुरांडे लेआउट परिसरात धारदार शस्त्राने दोघांवर हल्ला करण्यात आला आहे. यात एकाचा मृत्यू, तर एक जण गभींर जखमी आहे. अविनाश मसराम, असे मृत व्यक्तीचे तर सौरभ कुहेकर असे जखमीचे नाव आहे.
हेही वाचा- 'भाजपच्या खात्यातील रकमेत वाढ, मात्र देशातील रोजगारात घट'
अविनाश याचा प्रीतम चंदनखेडे आणि सुमित चंदनखेडे यांच्याशी पैशावरून वाद होता. दरम्यान, अविनाश मसराम आणि सौरभ कुहेरकर दुचाकीवरून जात होते. दरम्यान, पाळत ठेवत प्रीतम चंदनखेडे आणि त्याच्या सहकाऱ्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये अविनाश मसराम याचा जागीच मृत्यू झाला तर सौरभ कुहेरकर हा गंभीर जखमी झाला.
रामनगर पोलीस ठाण्यात याची माहिती मिळताच ठाणेदार धनाजी जळक यांना घटनास्थळी धाव घेतली. जखमी सौरभला तत्काळ सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आले. वेळीच उपचार मिळाल्याने सौरभला जीवनदान मिळाले आहे. या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी घटनास्थळी भेट देत हत्येचा घटनाक्रम समजून घेतला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.