ETV Bharat / state

सेवाग्रामनंतर सेलूमध्ये चोरट्टयांचा एटीएमवर डल्ला; साडे सात लाखांचा मुद्देमाल लंपास - सेलू एटीएम मशीन मशीन चोरी

वर्ध्यात सेवाग्राम नंतर सेलूमध्ये पुन्हा एटीएम मशीन चोरल्याची उघडकीस आली आहे. शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास चोरट्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन पळवून साडे सात लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

atm-stolen-from-sewagram-in-wardha
सेवाग्रामनंतर सेलूमध्ये चोरट्टयांचा एटीएमवर डल्ला;साडे सात लाखांचा मुद्देमाल लंपास
author img

By

Published : Jan 11, 2020, 4:57 AM IST

वर्धा - सेवाग्राम नंतर सेलूमध्ये पुन्हा एटीएम मशीन चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास चोरट्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन पळवून साडे सात लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

सेवाग्रामनंतर सेलूमध्ये चोरट्टयांचा एटीएमवर डल्ला;साडे सात लाखांचा मुद्देमाल लंपास

सेलू येथील यशवंत चौकातील महाराष्ट्र बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे अत्यंत शिताफीने पळवले. विशेष म्हणजे हे एटीएम पोलीस स्टेशनपासून अवघे 300 मीटर दूर आहे. सुरवातीला एका माणसाने तोंडाला रुमाल बांधून आतमध्ये प्रवेश केला. चोरीचे दृश्य रेकॉर्डिंग होऊ नये म्हणून त्याने कॅमेराची दिशा बदलवली. तसेच सायरन वाजू नये म्हणून वायरही कापून टाकली. त्यामुळे एटीएम मशीन 3.29 मिनीटांनी सर्व्हरच्या यंत्रणेपासून तुटली. त्यांनतर ही मशीन वाहनात टाकून पळवली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

एटीएम चालवण्याची जबाबदारी इपीएस सिस्टीमकडे कंपनीकडे आहे. त्या कंपनीचे अमोल तिघरे यांनी चोरीच्या घटनेची तक्रार केली आहेत. या घटनेत एटीएम मशीनमधील सहा लाख 94 हजार रुपयांची रक्कम तसेच एटीएम मशीन असा एकूण सात लाख 44 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

दरम्यान, अप्पर पोलीस निलेश मोरे यांच्यासह पोलीस उपअधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्माने, सेलू पोलीस निरीक्षक सुनील गाढे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. एक जानेवारीला सेवाग्राममध्येही अशाच पध्दतीने चोरट्यांनी एटीएम पळवले होते. या घटनेत 13 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. मात्र, यावेळी साडे सात लाखांची रोकड चोरट्यांनी पळवली आहे. त्यामुळे या दोन्ही घटना लक्षात घेता या घटनेचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा - 'निर्भया प्रकरणी दोषींच्या फाशीचे थेट प्रक्षेपण व्हावे'

Intro:mh_war_atm_chori_pkg_7204321

वर्ध्यात एटीएम मशीन चोरट्यांचा धुमाकूळ, 10 दिवसातील दुसरी घटना,

- एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी पळविली
- साडे सात लाखाचा मुद्दमेला पळवला.
- सायरन बंद करत, सीसीटीव्ही केले निकामी

वर्ध्यातील नवीन वर्षाचा शुभारंभच एटीएम मशिन चोरीच्या घटनेन झालाय. सेवाग्राम नंतर सेलूच्या यशवंत चौकात शुक्रवारी सकाळी पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती झाली. पाहटे साडे तीन वाजताच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन पळवल्याचे पुढे आले. विशेष म्हणजे हे एटीएम पोलीस स्टेशनपासून अवघे 300 मीटर आहे. असे असताना ही धाडशी चोरी करत चोरट्याने पोलिसांना एक प्रकारे आव्हान दिले आहे. यात सडे सात लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे.

सेलू येथे पोलीस स्टेशन जवळील महाराष्ट्र बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यानी पहाटे शिताफीने पळवले. यात सुरवातीला एका माणूस तोंडाला बांधून आतमध्ये प्रवेश करतो. तो एटीएम चोरीचे दृश्य रेकॉर्डिंग होऊ नये म्हणून कॅमेराची दिशा बदलवतो. तसेच सायरन वाजू नये म्हणून वायर कापून टाकण्यात आली. यामुळे चोरट्यांचे दृश्य टिपल्या गेले नाही. यात एटीएम मशीन 3.29 मिनीटांनी सर्व्हरच्या यंत्रणेपासून तुटली. त्यांनतर ही मशीनचा वाहनात टाकून पळवली असल्याचा अंदाज आहे.

इपीएस सिस्टीमकडे एटीएमची चालवण्याची जवाबदारी आहे. कंपनीचे अमोल तिघरे यांनी चोरीच्या घटनेची तक्रार केली आहेत. यात अज्ञात विरुद्ध चोरीची घटना नोंद करण्यात आली आहे. यात एटीएम मशीनमध्ये 6 लाख 94 हजार रुपयांची रक्कम तसेच एटीएममशिन किंमत धरून याय 7 लाख रुपये 44 हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

घटनास्थळी अप्पर पोलीस निलेश मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यासह पोलीस उपअधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्माने, सेलू पोलीस निरीक्षक सुनील गाढे यांनीही पाहणी केली. यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनेच्या पुढील तपास सुरू करण्यात आला. यात चोरट्यानी दिलेले आव्हानाला कशा पद्धतीने पोलीस यंत्रणा उत्तर देतात हे पाहने महत्वाचे असणार आहे.

सेवाग्राम पोलीस स्टेशनमध्ये वर्षच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला एटीएम अश्याचा मोडस ऑपरेडीचा अवलंब करत पळवले. यात 13 हजाराचा मुद्देमाल गेला होता. मात्र यावेळी साडे सात लाखाची रोकड चोरट्यानी पळवली आहे. चोरट्याच्या शोध घेण्यासाठी सर्वत्र शोध मोहीम सुरू करण्यात आले आहे.

Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.