वर्धा - बर्ड फ्ल्यू संबंधी वेगळा फार्स निर्माण झाला आहे. तो थांबवला गेला पाहिजे. देशात बर्ड फ्ल्यूने आजवर एकाही माणसाचा मृत्यू झालेला नाही. बर्ड फ्ल्यूनं एकाही माणसाचा मृत्यू झाला असेल तर शोधून द्या, शोधणाऱ्याला रोख रक्कम ताबडतोब बक्षिस म्हणून देण्यात येईल, असे म्हणत भीती न बाळगण्याचे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले आहे.
एखाद्या भागात बर्डफ्ल्यू आढल्यास त्या परिसरातील एक किलोमीटर परिसरातील सर्व पक्षी नष्ट केले जातात. कारण यामुळे या आजाराची लागण इतर पक्षांना होऊ नये. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. तसेच हे चिकन, मटन 70 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमानावर शिजवल्यावर कोणतीही भीती नाही. चिकन, अंडी खा आणि कोरोनावर लढण्यासाठी ताकद मिळवा असा संदेशही पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी यावेळी बोलताना दिला.