ETV Bharat / state

काळया घोड्याच्या नावाने भोंदूगिरी करणाऱ्यांस जेरबंद, अंनिसच्या प्रयत्नांने भांडाफोड

काळ्या घोड्याची नाल आणि अंगठीची विक्री करण्यासाठी तो त्याच्या साथीदारांसह शहरात आला होता. विशेष म्हणजे त्याने जुन्या घोडा गाडीसोबत सोबत ४ काळे घोडे सुद्धा आणले होते. काळ्या घोड्याच्या नालपासून अंगठ्या तयार केल्या जातात. या बोटात धारण केल्याने घरातील कौटुंबिक वाद, संकटे दूर होत असल्याचा दावा आरोपी करीत होता.

कारवाईत ताब्यात घेतलेले काळे घोडे
author img

By

Published : Apr 3, 2019, 10:38 AM IST

Updated : Apr 3, 2019, 3:12 PM IST

वर्धा - काळ्या घोड्याच्या नावाने शहरातील लोकांची फसवणूक करणाऱ्या लोकांचा अंनिसने भांडाफोड केला. त्यानंतर त्याला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याविरोधात जादूटोणा कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईबद्दल माहिती देताना अंनिसचे महाराष्ट्र राज्य युवा संघटक पंकज वंजारी

रामू सागर असे आरोपीचे नाव आहे. तो मध्यप्रदेशातील भोपाळचा रहिवासी आहे. काळ्या घोड्याची नाल आणि अंगठीची विक्री करण्यासाठी तो त्याच्या साथीदारांसह शहरात आला होता. विशेष म्हणजे त्याने जुन्या घोडा गाडीसोबत सोबत ४ काळे घोडे सुद्धा आणले होते. काळ्या घोड्याच्या नालपासून अंगठ्या तयार केल्या जातात. या बोटात धारण केल्याने घरातील कौटुंबिक वाद, संकटे दूर होत असल्याचा दावा तो करीत होता. एवढेच नाहीतर कुणाला मुल होत नसेल तर त्यांनाही याचा फायदा होतो असा खोटे दावाही त्यानी केला.

सर्वप्रकार भोंदुगिरी आणि अंधश्रद्धा पसरवणारा असल्याची माहिती अखिल भारतीय अनिसच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. पंकज वंजारी, पराग दांडगे यांनी शहरात शोध घेत शहर पोलिसांकडे त्यांना सोपवले. तो खोटी बतावणी करून नागरिकांना गंडा घालत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या इतर साथीदारांचाही शोध घेण्यात आला. मात्र, अल्पवयीन असल्याने त्यांना सोडण्यात आले.

घोड्याच्या टाचेचे संरक्षण करण्यासाठी लोखंडापासून ही नाल तयार केली जाते. नालेपासून मानवाला कुठलीही सुरक्षितता मिळू शकत नाही. नाल दारावर लावल्याने संकट , अतेंद्रीय आणि अनिष्ट शक्तिंपासून वाचता आले असते. किंवा भरपूर संपत्ती घरी आली असती, तर हे लोक नाल आणि अंगठी घेऊन रस्त्यावर कशाला विकत बसले असते? असा सवाल अंनिसचे महाराष्ट्र राज्य युवा संघटक पंकज वंजारी यांनी केला. याचाच विचार समाजाने करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

Intro:
काळया घोड्याच्या नावाने भोंदूगिरी करणाऱ्यांस जेरबंद,
अंनिसच्या प्रयत्नांने भांडा फोड

वर्धा - काळ्या घोड्याची नाल किंवा त्यापासून तय्यार होणारी अंगठीला जोडून अनेक अंधश्रद्धा आहे. याच अंधश्रद्धेचा फायदा घेऊन लोकांची फसवणूक करणाऱ्याना अंनिसने ताब्यात घेतले. खोटे दावे करत लोकांची फसवणूक करत असल्याने अनिस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. शहर पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले.

या काळ्या घोड्याच्या नाल पासून अंगठ्या तयार केल्या जातात. या बोटात धारण केल्याने घरातील कौटुंबिक वाद, संकटे, अडचणींवर दूर करत मात होत असल्याचा दावा हे विक्री करणारे करत होते. तसेच कुणाला मुल होत नसेल तर त्यांनाही याचा फायदा होतो असा दावा करीत होते.

काळ्या घोड्याची नाल आणि अंगठीची विक्री करण्यासाठी बाहेर राज्यातून काही लोक शहरात दाखल झाले होते. विशेष म्हणजे हे जुन्या घोडा गाडीसोबत सोबत चार काळे घोडे सुद्धा आणले होते. सदर प्रकार भोंदुगिरी आणि अंधश्रद्धा पसरविणारा असल्याची माहिती अभा अनिसच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. पंकज वंजारी, पराग दांडगे यांनी त्यांच शहारत शोध घेत घेत शहर पोलिसांकडे त्यांना सोपविले.

या प्रकरणात रामू सागर असे आरोपीचे नाव आहे. मध्यप्रदेश मधील भोपाळचा रहवासी होता. त्याच्यावर महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या कलम 8, 3, कलम 3(2), 2(1)Bच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले. यात विशेष म्हणजे जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्रातच लागू असल्याने बाहेर राज्यातून असे व्यवसाय करणाऱ्यां कायद्याची माहिती नसते. हेच या प्रकरणातून स्पष्ट झाले.

घोड्याच्या टाचीचे संरक्षण करण्यासाठी लोखंडापासून ही नाल तयार केली जाते. नालेपासून मानवाला कुठलीही सुरक्षितता मिळू शकत नाही. नाल दारावर लावल्याने संकट , अतेंद्रीय आणि अनिष्ट शक्तिंपासून वाचता आले असते किंवा भरपूर संपत्ती घरी आली असती तर हे लोक नाल आणि अंगठी घेऊन रस्त्यावर कशाला विकत बसले असते ? असा सवाल केला. इतक्या अंगठ्या घोडे सोबत असताना त्यांच्यावर जेरबंद होण्याचे संकट कशाला आले असते? याचाच विचार समाजाने करण्याची गरज असल्याचे मत अभा अंनिस महाराष्ट्र राज्य युवा संघटक पंकज वंजारी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले.

सदर तरुण खोटी बतावणी करून नागरिकांना गंडा घालत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या इतर साथीदारांचाही शोध घेण्यात आला. अभाअनिसचे डॉ धनंजय सोनटक्के, पराग दांडगे, रवी पुनसे, सागर मोडक, आशिष नंदनवार,भुषण मसने, मोहीत सहारे, संजय जवादे, प्रा. सुचिता ठाकरे, सुरज बोदिले, अमित राडे आदींनी या प्रकरणात चौकशी करत पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे काम केले.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Apr 3, 2019, 3:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.