ETV Bharat / state

वैद्यकीय अधिकार्‍याअभावी रुग्णवाहिकेला ब्रेक; कंत्राटी कंपनीचे दुर्लक्ष - 108 रुग्णवाहिका बातमी वर्धा

ग्रामीण रुग्णालय सेलू, राष्ट्रीय महामार्ग सहावर असलेले कारंजा शहर, उपजिल्हा रुग्णालय आर्वी आणि पूलगाव या चारही महत्त्वाच्या ठिकाणी प्रत्येक रुग्णवाहिकेवर कालावधीनुसार दोन डॉक्टरांची गरज आहे.

ambulance-service-stopped-due-to-their-is-no-doctor-available-in-wardha
वैद्यकीय अधिकार्‍याअभावी रुग्णवाहिकेला ब्रेक
author img

By

Published : Dec 3, 2019, 9:28 PM IST

वर्धा - तातडीने आरोग्य सेवा पुरवण्यासाठी '१०८ रुग्णवाहिका' हा उत्तम पर्याय आहे. मात्र, तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी रुग्णवाहिकेवर वैद्यकीय अधिकारी नसल्याने तत्काळ रुग्णसेवा मिळण्यास अडचण होत आहे. 108 रुग्णवाहिका आणि त्यावर कार्यरत डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे कंत्राट पुण्यातील 'बीव्हीजी इंडिया' या कंपनीला देण्यात आले आहे.

वैद्यकीय अधिकार्‍याअभावी रुग्णवाहिकेला ब्रेक

हेही वाचा- फुल्ल ढोसून झोपले तळीराम गुरुजी; विद्यार्थ्यांची पाटी राहिली कोरी

तत्काळ रुग्णसेवा देण्यासाठी 108 रुग्णवाहिकेचे विशेष महत्व आहे. आजही ग्रामीण भागातील नागरिक गरजेवेळी 108 नंबरवर संपर्क करतात. मात्र, ग्रामीण रुग्णालय सेलू, राष्ट्रीय महामार्ग सहावर असलेले कारंजा शहर, उपजिल्हा रुग्णालय आर्वी आणि पूलगाव या चारही महत्त्वाच्या ठिकाणी प्रत्येक रुग्णवाहिकेवर कालावधीनुसार दोन डॉक्टरांची गरज असते. परंतु, काही इतर ठिकाणी झालेल्या भरती प्रक्रियेतून मिळालेल्या नवीन नोकरीमुळे हे पद रिक्त झाले आहे.

बीव्हीजी इंडिया कंपनीला जिल्हा शल्यचिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी विषयाची गंभीरता लक्षात घेता त्वरित दुसरी सोय उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. तसेच याची माहिती नागपूर, पुणे आणि मुंबई येथील संबंधित यंत्रणेला दिली आहे. असे असले तरी यात आठ दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी लोटूनही यंत्रणेकडून कुठलेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.

Intro:mh_war_ambulance_byte_7204321

वैद्यकीय अधिकार्‍याअभावी 108 ची रुग्णवाहिका धावण्यास अडचण

वर्धा- तातडीने आरोग्य सेवा पुरवण्यासाठी
१०८ रुग्णवाहिका हा उत्तम पर्याय आहे. पण, तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणी रुग्णवाहिकेवर वैद्यकीय अधिकारी नसल्याने तात्काळ रुग्णसेवा मिळण्यास अडचण होत आहे. 108 रुग्णवाहिका आणि त्यावर कार्यरत डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा कंत्राट पुण्यातील बी व्ही जी इंडिया या कंपनीला देण्यात आलेला आहे. यामुळे लवकरात लवकर डॉक्टर उपलब्ध करून द्याव्यात अश्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याडून देण्यात आल्या आहेत.

तात्काळ रुग्णसेवा देण्यासाठी 108 रुग्णवाहिकेचे विशेष महत्व आहे. अपघात सारख्या घटनेत विशेष भूमिका राबवत जीवन देणारी म्हणून 108 रुग्णवाहिका आहे. आजही ग्रामीण भागातील नागरिकांना गरज पडल्यास हा 108 नंबर डायल करत गावात रुग्णवाहिका बोलवतात. पण ग्रामीण रुग्णालय सेलू, राष्ट्रीय महामार्ग सहावर असलेले कारंजा शहर, उपजिल्हा रुग्णालय आर्वी आणि पुलगाव या चारही महत्वाच्या ठिकाणी प्रत्येक रुग्णवाहिकेवर कालावधी नुसार दोन डॉक्टरांची गरज असते. पण काही इतर ठिकाणी झालेल्या भरती प्रक्रियेतून मिळालेल्या नवीन नौकरीमुळे पद रिक्त झाले आहे. यामुळे रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेले खाजगी कामाला राम राम केला.

महाराष्ट्रभर धावणाऱ्या 108 चा कारभार चालतो पुण्यातून

१०८ या रुग्णवाहिकेचे १०८ पुण्यावरून नियंत्रण केले जाते. रुग्णवाहिकेसाठी तात्काळ मागणी झल्यास तात्काळ उपचार करता यावा हाच उद्देश आहे. पण जर या रुग्णवाहिकेत सेवा देणारे डॉक्टर नसतील तर याचा फारसा काही उपयोग होऊ शकत नाही. यामुळे वैदकीय अधिकारी नसणे हे साधे वाटत असले तरी कोणाचा तरी जीवावर बेतण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.

बी व्ही जी इंडिया कंपनीला जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी विषयाची गंभीरता लक्षात घेता त्वरित दुसरी सोय उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. तसेच याची माहिती नागपूर, पुणे आणि मुंबई येथील संबंधित यंत्रणेला दिली आहे. असे असले तरी यात आठ दिवसांपेक्षा अधिकच कालावधी लोटूनही यंत्रणेकडून कुठलेच ठोस पाऊल उचलले गेले नाहीत.

Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.