ETV Bharat / state

अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांचा बंद तर, आयुष डॉक्टरांचे गुलाबी फित लावून कामकाज - वर्धा अ‌ॅलोपॅथी डॉक्टर्स संप न्यूज

आयुष डॉक्टरांना 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास परवानगी मिळाली आहे. यामुळे आयुष आणि अ‌ॅलोपॅथी डॉक्टरांमध्ये दुफळी निर्माण झाली. काल अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी संप पुकारला तर, आयुष डॉक्टरांनी गुलाबी फिती लावून कामकाज केले.

Doctor
डॉक्टर
author img

By

Published : Dec 12, 2020, 10:17 AM IST

वर्धा - सीसीआयएमच्या सूचनेवरून बीएएमएस पदवीधारकांना 58 शस्त्रकिया करण्यास परवानगी मिळाली आहे. या निर्णयावरून नवीन वादाला सुरुवात झाली. याविरोधात आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन)च्यावतीने देशव्यापी संप पुकारण्यात आला. वर्ध्यातही अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी बंद पुकारला तर, दुसरीकडे आयुष डॉक्टरांनी गुलाबी फित लावून कामकाज केले.

आयुष(आयुर्वेदिक) आणि अ‌ॅलोपॅथी डॉक्टरांमध्ये दुफळी निर्माण झाली

वर्धा जिल्ह्यातील अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांचे दवाखाने अत्यावश्यक सेवा वगळता बंद होते. मात्र, आयुष डॉक्टरांनी गुलाबी फित लावून रुग्णेसवा सुरू ठेवत कर्तव्य बजावले. आयुर्वेदिक पदव्यूत्तर डॉक्टरांना 58 शस्त्रक्रिया करण्यास सरकारने परवानगी दिल्याने आयुष(आयुर्वेदिक) आणि अ‌ॅलोपॅथी डॉक्टरांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे.

सामान्य नागरिकांना कळावे यासाठी संप -

आयुष डॉक्टरांना 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास परवानगी मिळाली आहे. या परवानगीने नेमके काय होणार आहे हे सर्व सामान्य लोकांना माहित नाही. त्यांना कदाचित याचे गंभीर परिणामही भोगावे लागतील. आयुर्वेद आणि अ‌ॅलोपॅथी दोन्ही अभ्यासक्रम वेगळे आहे. नवीन निर्णयामुळे आता खिचडी निर्माण झाली आहे. याची माहिती सर्वसामान्यांना मिळावी यासाठी संप केला आहे. शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी आयएमच्या डॉक्टरांनी केल्याचे आयएमएचे सचिव विपीन राऊत यांनी सांगितले.

तीन हजार वर्षांपूर्वीची सुश्रुत संहिता प्रभावीपणे जगापुढे आणण्याची संधी -

परवानगी मिळालेल्या ५८ शस्त्रक्रिया या अभ्यासक्रमात अगोदरपासूनच शिकवल्या जातात. नवीन निर्णयाने त्यांना राजपत्रित दर्जा मिळणार आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. यामुळे तीन हजार वर्षांपूर्वी सुश्रुत यांनी प्लास्टिक सर्जरी, डोळ्यांची शस्त्रक्रिया अशा अनेक शस्त्रक्रिया लिहून ठेवल्या आहेत. शल्य आणि शलाख्य हा प्राचीन अभ्यासक्रम अजून ताकदीने जगापुढे आणता येईल. या शस्त्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू आहेत. मात्र, आयएमए आताच का विरोध करत आहे, अनाकलनीय असल्याचे निमाचे सदस्य डॉ. चंद्रकांत जाधव यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले.

दरम्यान, डॉक्टरांची एकाच दिवशी दोन वेगवेगळी आंदोलने नागरिकांना पहायला मिळाली. बंदमुळे अ‍ॅलोपॅथी दवाखान्यात आलेल्या रुग्णांना परत जाण्याची वेळ आली. हा वाद दोन अभ्यासक्रमांचा असला तरी याचा फटका मात्र, सर्वसामान्य रुग्णांना बसला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.