ETV Bharat / state

...अन्यथा मंत्रालयावर धडक मोर्चा काढू, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

एकतर्फी प्रेमातून वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये २४ वर्षीय प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आले होते. त्यात पीडितेचा मृत्यू झाल्याने सर्वच स्तरांमधून रोष व्यक्त करण्यात आला. या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांशी भेट घेवून मराठा क्रांती मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे सांत्वन केले.

author img

By

Published : Feb 16, 2020, 8:47 PM IST

Updated : Feb 16, 2020, 9:48 PM IST

patil
...अन्यथा मंत्रालयावर धडक मोर्चा काढू

वर्धा - हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातातील पीडित प्राध्यापिकेच्या कुटुंबीयांशी रविवारी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे प्रमुख समन्वयक आबासाहेब पाटील यांनी भेट घेतली. पीडितेच्या कुटुंबीयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता लवकरात लवकर न केल्यास २७ आणि २८ फेब्रुवारीला मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.

...अन्यथा मंत्रालयावर धडक मोर्चा काढू, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

एकतर्फी प्रेमातून वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये २४ वर्षीय प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आले होते. त्यात पीडितेचा मृत्यू झाल्याने सर्वच स्तरांमधून रोष व्यक्त करण्यात आला. या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांशी भेट घेवून मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे सांत्वन केले. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने कठोर कायदे करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आरोपींना सुरक्षा देऊन कारागृहात ठेवले जाते. तीच सुरक्षा महिलांना का देत नाही, असा सवालही यावेळी करण्यात आला. आरोपीला शिक्षा देणे शासनाला जमत नसेल, तर आरोपीला आमच्याकडे द्या, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांची आहे. हीच भूमिका आमचीही असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा - 'आज छत्रपतींची आठवण येते..! त्यांच्या काळातील कायदे आता लागू करण्याची गरज'

पीडितेच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची मदत, भावाला दिलेल्या नोकरीच्या आश्वासनाची शासनाने लवकर पूर्तता करावी, महिलांवरील अन्यायाविरोधात एक दिवसीय अधिवेशन बोलवून कडक कायदा करावा, खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची घोषित केल्याप्रमाणे तत्काळ नियुक्ती जाहीर करावी, अशा मागण्या यावेळी पदाधिकाऱ्यांनी केल्या.

Last Updated : Feb 16, 2020, 9:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.