ETV Bharat / state

वडिलांचा आधार गेला तरीही निराधाराना मदतीचा हात, चौदावीचा कार्यक्रम न करता शासनाला दिले 51 हजार - चौदावीचा कार्यक्रम न करता शासनाला दिले 51 हजार

रवी अंजाडे हे तलाठी म्हणून धानोडी साजाला कार्यरत आहे. 1 एप्रिलला त्यांच्या वडिलांचे आजार आणि वृद्धपकाळाने निधन झाले. या काळात लॉकडाऊनमुळे चौदाविचा कार्यक्रम न करता त्यासाठी लागणारा खर्च हा खऱ्या गरजूंपर्यंत पोहचवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

a man from wardha district help to needy people in lockdown
वडिलांचा आधार गेला तरीही निराधाराना मदतीचा हात, चौदावीचा कार्यक्रम न करता शासनाला दिले 51 हजार
author img

By

Published : Apr 18, 2020, 8:29 AM IST

वर्धा - खरंतर वडील हे मुलाचा आधार असतात. मात्र, वृद्धापकाळ आणि आजाराने वडिलांचे निधन झाले. लॉकडाऊनच्या काळात चौदाविचा कार्यक्रम होऊ शकत नव्हता. पण या पैश्यातून लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अनेक गरजुंना आधार देण्यासाठी रवी अंजाडे यांनी ५१ हजार रुपयांची मदत केली आहे. ही मदत त्यांनी तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांच्याकडे सोपवली आहे.

a man from wardha district help to needy people in lockdown
रवी अंजाडे तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांच्याकडे मदत सोपवताना

रवी अंजाडे हे तलाठी म्हणून धानोडी साजाला कार्यरत आहे. 1 एप्रिलला त्यांच्या वडिलांचे आजार आणि वृद्धपकाळाने निधन झाले. या काळात लॉकडाऊनमुळे चौदाविचा कार्यक्रम न करता त्यासाठी लागणारा खर्च हा खऱ्या गरजूंपर्यंत पोहचवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गरजूंना तेल तिखट मिठाचा आधार मिळावा, म्हणून तहसीलदार विद्यासागर चव्हाण याना हा 51 हजाराचा धनादेश सोपवला. हा धनादेश गरजवंतासाठी खर्च करावा, असेही त्यांनी सांगितले.

चौदाविचा कार्यक्रम रद्द झाल्याने त्या कार्यक्रमासाठी लागणारे पैसे शिल्लक पडले. पण यातून आपले आधारस्तंभ असलेले वडील गेले असले तर आपण या पैश्यातून कोणाला आधार देऊ शकलो, तर वडिलांना खऱ्या अर्थाने आदरांजली लाभेल. वडील गेल्याचे दुःख आहे, पण या पैश्याने दोन चेहऱ्यांवर हसू आले त्याचे समाधान सुद्धा आहे, असेही ते म्हणाले.

मोठ्या प्रमाणात सामाजिक संस्था पुढाकार घेऊ मदतीला धावल्या आहेत. गरज पडल्यास त्या ठिकाणी या निधीचा उपयोग घेण्याचा निर्णय पुढील काळात घेतला जाईल. शासन स्तरावर सुद्धा जमा करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकेल, असे मत आर्वीचे तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.