ETV Bharat / state

Wardha Crime : होळीच्या पर्वावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

सर्वात महत्त्वाचा सण समाजाला जाणारा होळी हा फक्त एका दिवसावर येऊन ठेपला आहे. होळी हा सण अतिशय शांततेत पार पडावा याकरता पोलिसांनी कंबर कसली असून वर्ध्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पाच लाख पन्नास हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

wardha crime
होळीच्या पर्वावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
author img

By

Published : Mar 5, 2023, 12:38 PM IST

होळीच्या पर्वावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वर्धा : होळीच्या सणासाठी पोलीस यंत्रणा चांगलीच कामाला लागलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखा वर्धाच्या पथकाने कोंबिंग ऑपरेशन राबवताना गोपनीय माहितीच्या आधारावर नाकेबंदी केली आहे. एका पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कंपनीच्या गाडीतून तब्बल पाच लाख रुपयांच्यावर किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे.

अवैध व्यवसायिकांचे मनसूबे उध्वस्त : या कारवाईमध्ये देशी दारू पकडण्यात आली आहे. सात खोक्यात गोवा संत्रा देशी दारू कंपनीच्या 10 एम.एल.च्या 336 काचेच्या बाटल्या होत्या. प्रती 150 रुपये प्रमाणे अंदाजे एकूण पाच लाख पन्नास हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही दमदार कारवाई केली आहे. स्विफ्ट डिझायर हे चार चाकी वाहन क्रमांक एम एच 02 सी व्ही 9679 ही गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. या अंतर्गत दोन आरोपींविरोधात विविध कलमान्वये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांची कारवाई : आरोपी फरार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ही दमदार कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसापासून वर्धाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचारी हे अवैध व्यवसायिकांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. त्यांनी वेळोवेळी अवैध व्यवसायिकांचे मनसूबे उध्वस्त केले आहे. गेल्या काही काळात वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने अवैध व्यावसायिकांना चांगलेच धारेवर धरण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घेतली जात आहे.

होळीच्या सणादरम्यान दारूचा महापूर : होळीचा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. होळीच्या सणादरम्यान दारूचा महापूर मोठ्या प्रमाणामध्ये वाहत असतो. यामुळे गुन्हेगारी वृत्तीचे काही लोक समाजात अशांतता निर्माण करत असतात. त्यावर अंकुश लावण्यासाठी आता पोलिसांनी या संदर्भात मोठी कारवाई केली आहे. नागरिकांना होळीचा सण शांततेने साजरा करण्यात यावा यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. आज केलेल्या कारवाईने दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिसांचे कौतूक होत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संजय गायकवाड पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक लालपालवाले, जमादार, सुभाष राऊत, संजय राठोड, अमोल ढोबाळे, नितिन मेश्राम यांनी केली आहे.

हेही वाचा : Liquor Seized in Thane: मोठी कारवाई! मद्याचा ४८.५६ लाखांचा साठा जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.