वर्धा - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अधिकाधिक लसीकरण करण्याच्या पर्याय पुढे येत आहे. यासाठीच लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. पण अजूनही लसीकरणाच्या बाबतीत गैरसमज आहेतच. यामुळे लसीकरण वाढविण्यासाठी नवनवीन संकल्पना पुढे येत आहेत. यात राज्याचे पशुसंवर्धन तथा पालकमंत्री सुनील केदार यांच्या संकल्पनेतून वर्धा जिल्ह्यात बक्षीस योजना पुढे आली आहे.
या योजनेत वर्धा जिल्ह्यात ग्रामपंचायत, नगर परिषदांच्या वॉर्डांसाठी प्रोत्साहन अनुदान म्हणून पाच लाख रुपये दिले जाणार आहेत. जिल्ह्याच्या आठ तालुक्यात बक्षीस देण्यासाठी डीपीसी फंडातून हा निधी दिला जाणार आहे. जिल्ह्यात सध्या 45 वर्षांवरील व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. पण नागरिकांमध्ये अजूनही गैरसमज आणि भीतीचे वातावरणात दूर झालेले नाही. यामुळे कोरोनातून वाचायचे असल्यास जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण व्हावे, अशी संकल्पना आहे. यासाठी लसीकरणाचे केंद्रही वाढवले जात आहेत.
जिल्हाधिकारी कोरोनावरील लस पूर्णत: सुरक्षित आहे. प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे. गैरसमज किंवा भीती बाळगण्याची गरज नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.
जिल्ह्यात लसीकरणाची स्थिती
जिल्ह्यात 45 वर्ष वरील आणि वयोवृद्धांना या लसीकरण मोहिमेत प्राध्यान्य देऊन लसीकरण केले जात आहे. यात जिल्ह्यात साधारण 59 केंद्रावर शहर आणि ग्रामीण भागात लस दिली जात आहे. यामध्ये उपजिल्हा ग्रामीण, तसेच पीएचसी केंद्रावर सोय उपलब्ध आहे. यात आतापर्यंत जवळपास 90 हजार 144 लोकांना लस देण्यात आली आहे. या मोहिमेतून नक्कीच या योजनेचा लाभ नागरिक आणि कोरोनाच्या लढ्यात सर्वांना होणार आहे.
हेही वाचा - पवनारच्या आशा वर्करांच्या कामाची 'टाईम'ने घेतली दखल; मानधन वाढीसाठी सरकारकडे 'आशा'च
हेही वाचा - रेल्वे सुरक्षा कर्मचारी मदतीला धावला, महिलेला मिळालं जीवनदान