ETV Bharat / state

व्यापाऱ्यांची नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांकडे दुकाने उघडू देण्याची मागणी - world health emergency

शासनाने ऑरेंज झोनमधील दुकाने उघडण्यासाठी काही नियम आणि अटी दिल्या आहेत. या नियमांचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत व्यापारी संकुले उघडू देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. मात्र, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभारे यांनी हा विषय आपल्या अखत्यारित नसल्याचे सांगत ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, तूर्त तरी दुकाने उघडण्यात येणार नसल्याचेही सांगितले आहे.

व्यापाऱ्यांची नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांकडे दुकाने उघडू देण्याची मागणी

author img

By

Published : May 6, 2020, 1:13 PM IST

बदनापूर (जालना) - शासनाने 4 मे नंतर लॉकडाऊन कायम ठेवतानाच ऑरेंज झोनमधील दुकाने उघडण्यासाठी काही नियम आणि अटी दिल्या आहेत. या नियमांचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत व्यापारी संकुले उघडू देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. मात्र, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभारे यांनी हा विषय आपल्या अखत्यारित नसल्याचे सांगत ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, तूर्त तरी दुकाने उघडण्यात येणार नसल्याचेही सांगितले आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्याअंतर्गत बदनापूरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद आहेत. 4 मे नंतर सुरू झालेल्या लॉकडाऊन दरम्यान शासनाने ऑरेंज झोनमधील दुकाने टप्याटप्प्याने सुरू करण्याचे सुचवलेले आहे. यानुसार, येथील व्यापाऱ्यांनी नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 17 मार्च 2020 पासून लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर कोणतीही व्यापारी प्रतिष्ठाने उघडून व्यवसाय करता येत नाही. जालना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तर जिल्हयातील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना आणि फळे व भाजी विक्रेत्यांनाही सकाळी 7 ते 2 एवढा वेळ दिला आहे. बदनापूर नगर पंचायतनेही जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार जीवनावश्यक वस्तूंची विक्री दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. फळे व भाजीपाला विक्रेत्यांनाही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात दुकाने लावण्यास परवानगी दिली आहे.

4 मे रोजी तिसरे लॉकडाऊन सुरू झाले आहे. यादरम्यान दुकाने सुरू करण्यासंबंधात शासनाने विविध मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्या अनुषंगाने बदनापूर तालुक्यातही दुकाने सुरू करण्यात येऊन व्यवसाय सुरू होईल, अशी बदनापूरच्या व्यापाऱ्यांची अपेक्षा होती. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारीत आदेश काढून जीवनावश्यक वस्तू आणि कृषी विषयक दुकानांशिवाय इतर दुकाने उघडण्यावर बंदी कायम ठेवली. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे शासनाच्या नियमानुसार व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत व्यापारी संकुले सुरू करण्याच्या परवानगीची मागणी केली.

मुख्याधिकारी डॉ. अंभोरे यांनी ही बाब आपल्या अधिकार क्षेत्रात येत नसल्नयाचे सांगून ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर आदेश देईपर्यंत व्यावसायिक प्रतिष्ठान उघडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.