ETV Bharat / state

वैद्यकीय विभागाच्या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची तयारी; अमित देशमुखांचा राज्यपालांना प्रस्ताव - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परिक्षा येत्या 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. तसा प्रस्तावही विद्यापीठाने दिला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिली.

madical exams 2020
वैद्यकीय विभागाच्या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची तयारी; मंत्री अमित देशमुखांचा राज्यपालांना प्रस्ताव
author img

By

Published : Jun 4, 2020, 7:41 PM IST

मुंबई - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परिक्षा लॉकडाऊनमुळे अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या परीक्षा येत्या 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. तसा प्रस्तावही विद्यापीठाने दिला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिली. तसेच देशमुख यांनी त्यासाठीचा प्रस्ताव राज्यपालांकडे सादर केला.

15 जुलैपासून परीक्षा घेण्याचा प्रस्ताव असला, तरी राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन त्यामध्ये बदल केले जातील, असेही त्यात देशमुख यांनी म्हटले आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति कुलपती अमित विलासराव देशमुख यांनी आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेच्या एम. डी., एम. एस.पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचर्या व तत्सम तसेच सर्व पदवी विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांकडून परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

15 जुलैपासून वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, काही अनपेक्षित गोष्टी घडल्यास याबाबत परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्या-त्या वेळी निर्णय घेण्यात येतील, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. 15 जुलैपासून घेण्यात येणाऱ्या परीक्षेची विद्यार्थ्यांनी तयारी करावी, असे आवाहनही अमित देशमुख यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.