ठाणे - दीड वर्षांपुर्वी झारखंड राज्यातील साहेबगंज जिल्ह्यातील बरहट गावात एकावर फायरिंग करून खुन करून आरोपी फरार झाला होता. फरार आरोपीला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या टिमने जेरबंद केले आहे. राजेंद्र यादव असे गुन्हेगाराचे नाव असून यापूर्वीच्या एका खुनाप्रकरणी तो जेलमध्ये होता.
हेही वाचा - डोंबिवलीत मोबाईल दुकान फोडून चोरट्यांनी पळवले १७ लाखांचे मोबाईल
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडीपार व सराईत गुन्हेगारांचा शोध चालू आहे. यासाठी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनुसार शहरात गस्त घालून फरार आरोपीचा शोध चालू होता. यातच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत दीड वर्षांपुर्वी झारखंड राज्यातील साहेबगंज येथील घटनेतील आरोपीची माहिती मिळाली.
एप्रिल २०१८ मध्ये जमिनीच्या वादावरून राजेंद्र महावीर यादव याने त्याचा मोठा भाऊ महेंद्र यादव दोघांनी मिळून रामबाबू साव उर्फ साह यावर फायरिंग करून त्याचा खुन केला. आरोपी फरार झाले. आरोपीला उल्हासनगर गुन्हे शाखेने कॅम्प एक, म्हारळ नाका, धोबीघाट या ठिकाणाहून जेरबंद केले. अटकेत असताना त्याची कसुन चौकशी केली असता बरहट पोलीस ठाण्यात आरोपी राजेंद्र यादव याने यापूर्वी १९९९ मध्ये बरहट गाव जिल्हा साहेबगंज येथे शिवकुमार साव नावाच्या व्यक्तीवर चाकूने वार करून ठार मारले होते. तसेच २००३ मध्ये शंकर माथुर याला पाण्यात बुडवून मारले होते. या खुनाच्या गुन्ह्यात त्याला अटक होऊन त्याला शिक्षा झाली होती.
हेही वाचा - अकाेल्यात निवडणूक आयोगाच्या पथकाकडून साडेपाच लाखांची रोकड जप्त