ETV Bharat / state

ठाणे : उल्हासनगर येथे तरुणाचा खून, हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद - thane police

पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना उल्हासनगर येथे घडली आहे.

मृत दीपक भोईर
मृत दीपक भोईर
author img

By

Published : Jan 21, 2020, 4:57 PM IST

ठाणे - बारमधून निघालेल्या तरुणाचा 8 ते 10 जणांच्या टोळक्याने तीक्ष्ण हत्याराने हल्ला करत खून केल्याची घटना घडली आहे. दीपक भोईर, असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

उल्हासनगर येथे तरूणाचा खून

ही घटना उल्हासनगरच्या धुरू बारच्या शेजारी असलेल्या पटेल लो-प्राईज या दुकानासमोर घडली आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दीपक भोईर असे निर्घृण हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो माणेरे गावातील रहिवासी होता. एका बारबालेने तरुणाला मोबाईलवर संपर्क करून बारमध्ये बोलावले. मात्र, आदीपासूनच दबा धरून असलेल्या मारेकरांच्या तावडीत तो सापडला. त्यावेळी बारच्या आवारातच त्या तरुणाला गाठून त्याच्यावर ८ ते १० जणांच्या टोळक्याने तीक्ष्ण हत्याराने हल्ला करत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हेही वाचा - ठाण्यात संतप्त प्रियकराचा विवाहित प्रेयसीच्या आईवर तलवारीने हल्ला

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ८ ते १० जणांच्या टोळक्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नरेश उर्फ बबल्या चव्हाण, असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याचे ३ ते ४ साथीदार पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

हेही वाचा - मुंब्रामध्ये #CAA आणि #NRC विरोधात ठिय्या आंदोलन

मृत दीपक भोईर याला मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगरमधील वादग्रस्त असलेल्या धुरुबारमध्ये एका बारबालाने फोन करून भेटायला बोलावले होते. त्यावेळी बारमधून तिला भेटून आल्यांनतर बारच्या आवारात आरोपी नरेश उर्फ बबल्या चव्हाण व त्याच्या साथीदारासह हल्ल्याच्या तयारीत होता. दिपकला पाहताच हल्लेखोरांनी त्याच्या पाठलाग करून त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दीपकच्या डोक्यावर, पाठीवर, हातावर गंभीर वार झाले. त्याला जवळच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती दीपकच्या नातेवाईकांनी दिली.

दरम्यान, उल्हासनगरमध्ये रात्रभर राजरोसपणे सुरू असलेल्या ऑर्केस्ट्रा बारमुळे गुन्हेगारी वाढत असून, नेहरू चौकात सुरू असलेल्या धुरू बारचा या हत्येशी संबंध असल्याचे सूत्रांकडून माहिती पुढे येत आहे. तर रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या धुरुबारच्या आवारातील हत्येची ही दुसरी घटना आहे. मात्र, या हत्येमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे मृत दिपकच्या नातेवाईकांनी हत्या करणाऱ्या सर्वच आरोपींना पोलीस अटक करत नाहीत, तोपर्यंत दीपकचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले.

हेही वाचा - ...'त्यापेक्षा उपमहापौर पदाचा राजीनामा दिलेला बरा'

Intro:kit 319Body:बारबालाला भेटायला गेलेला तरुण दुश्मनांच्या तावडीत सापडल्याने निर्घृण हत्या; हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

ठाणे : एका बारबालेने त्या तरुणाला मोबाईलवर संपर्क करून बारमध्ये बोलावले. मात्र आदीपासूनच घात लावून बसलेल्या दुश्मनांच्या तावडीत तो सापडलेला. त्यावेळी बारच्या आवारातच त्या तरुणाला गाठून त्याच्यावर ८ ते १० जणांच्या टोळक्याने तीक्ष्ण हत्याराने हल्ला निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना उल्हासनगरच्या धूरु बारच्या शेजारी असलेल्या पटेल लो प्राईज या शॉपसमोर घडली आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दिपक भोईर असे निर्घृण हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून माणेरे गावातील रहिवासी होता.
याप्रकरणी उल्हानसागर पोलीस ठाण्यात ८ ते १० जणांच्या टोळक्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. नरेश उर्फ बबल्या चव्हाण असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याचे ३ ते ४ साथीदार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृतक दीपक भोईर याला मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगरमधील वादग्रस्त असलेल्या धुरुबार मध्ये एका बारबालाने मोबाईल फोन वरून संपर्क करून भेटायला बोलावले होते. त्यावेळी बारमधून तिला भेटून आल्यांनतर बारच्या आवारात आरोपी नरेश उर्फ बबल्या चव्हाण व त्याच्या साथीदार हल्ल्याच्या तयारीत होते. दिपकला पाहताच हल्लेखोरांनी त्याच्या पाठलाग करून त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दीपकच्या डोक्यावर, पाठीवर ,हातावर गंभीर वार झाल्याने त्याला नजीकच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात घेऊन गेले असता त्याला डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले. ही दिपकची हत्या पूर्व वैमान्यस्यातून झाली का ? इतर कारणावरून करण्यात आली याचा तपास उल्हासनगर पोलीस करीत आहेत.
दरम्यान उल्हासनगरमध्ये रात्रभर राजरोसपणे सुरू असलेल्या ऑर्केस्ट्रा बारमुळे गुन्हेगारी वाढत असून, नेहरू चौकात सुरू असलेल्या धुरू बारचा या हत्येशी संबंध असल्याचे सूत्रांकडून माहिती पुढे येत आहे. तर रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या धूरुबारच्या आवारातील हत्येची ही दुसरी घटना आहे. मात्र या हत्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे मृतक दिपकच्या नातेवाईकांनी हत्या करणाऱ्या सर्वच आरोपींना जोपर्यत पोलीस अटक करीत नाही. तोपर्यत दीपकचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याने सांगितल्याने परिसरातील वातावरण तंग झाले आहे.
१ बाईट / सुशील जावळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) mrathi, hindi
२ बाईट / नातेवाईक (वसंत भोईर मृतकाचे काका )

Conclusion:ulhasngar mardar
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.