ETV Bharat / state

मुंब्र्यात वाहतूक कारवाई करताना युवकांचा 'राडा'; वाहतूक पोलिसांना केली मारहाण - युवकांनी केली वाहतूक पोलिसांना मारहाण

अफनान कुरेशी, शमसुद्दीन अहमद बांगी, तमसील अफाक कुरेशी व फैजान शेख या चौघांवर गुन्हा दाखल झाला असून तिघांना ताब्यात घेतले आहे व एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. कायद्याचा व पोलिसांचा कोणताच धाक या युवकांच्या मनात राहिला नसल्याचेच या घटनेवरून दिसून येते.

वाहतूक पोलिसांना केली मारहाण
author img

By

Published : Aug 20, 2019, 7:47 AM IST

Updated : Aug 20, 2019, 8:48 AM IST

ठाणे - मुंब्र्यात वाहतूक कारवाई दरम्यान युवकाने जोरदार धिंगाणा घातल्याची घटना घडली. यावेळी त्याने वाहतूक पोलिसांना मारहाणदेखील केली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून एक जण फरार आहे. अफनान कुरेशी, शमसुद्दीन अहमद बांगी, तमसील अफाक कुरेशी व फैजान शेख असे त्या मुजोर युवकांची नावे आहेत.

मुंब्र्यात वाहतूक कारवाई करताना युवकांचा 'राडा'; वाहतूक पोलिसांना केली मारहाण

मुंब्र्यातील काही मुजोर युवक वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मुंब्रा वाहतूक विभागाच्यावतीने वाहतूक कारवाई करण्यात येत होती. यावेळी काही युवक व एका महिलेने जबरदस्त राडा सुरू केला. मुंब्रा येथील कन्व्हर नगर येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश लंबाते यांच्या वाहतूक कारवाईदरम्यान पकडलेल्या दुचाकी स्वारांनी राडा करण्यास सुरुवात केली. आपले लायसन का घेतले? असा जाब विचारत या युवकांनी उपस्थित वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण केली. यावेळी मोठा जमाव गोळा झाला होता. त्यानंतर काही वेळात या युवकांची मजल या वाहतूक पोलिसांना मारण्यापर्यंत गेली.

अंगद मुंडे, प्रशांत गोसावी, दिनेश राऊत व विनायक वाघमारे अशी या पोलिसांची नावे आहेत. याप्रसंगी झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन एका वाहतूक पोलिसाची काठी व मोबाईलदेखील लांबवण्यात आला. पोलिसांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करणाऱ्या चार जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

Intro:मुंब्र्यात वाहतूक कारवाई दरम्यान युवकांचा जोरदार राडा वाहतूक पोलिसांना केली मारहाण तिघे ताब्यात एक जण फरार Body:
आपण पहात असलेला हा व्हिडियो एखाद्या रस्त्यावरील लफड्याचा आहे असे जर आपल्याला वाटत असेल तर ते साफ खोटे आहे. ही आहेत मुंब्र्यातील काही मुजोर युवक जे वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण करत आहेत. मुंब्रा वाहतूक विभागाच्या वतीने आज होत असलेल्या वाहतूक कारवाई दरम्यान काही युवक व एका महिलेने जबरदस्त राडा केला. मुंब्रा कन्व्हर नगर येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश लंबाते यांच्या कारवाई दरम्यान पकडलेल्या दुचाकी स्वारांनी राडा करण्यास सुरुवात केली. आपले लायसन का घेतले असा जाब विचारत या युवकांनी उपस्थित वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण केली. यावेळी मोठा जमाव गोळा झाला होता. थोड्याच वेळात या युवकांची मजल या वाहतूक पोलिसांना मारण्यापर्यंत गेली. अंगद मुंडे, प्रशांत गोसावी, दिनेश राऊत व विनायक वाघमारे अशी या पोलिसांची नावरले आहेत. याप्रसंगी झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन एका वाहतूक पोलिसाची काठी व मोबाईल देखील लांबविण्यात आला. पोलिसांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करणाऱ्या चार जणांवर पोलिसांनी IPC 353, 332, 427 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अफनान कुरेशी, शमसुद्दीन अहमद बांगी, तमसील अफाक कुरेशी व फैजान शेख या चौघांवर गुन्हा दाखल झाला असून तिघांना ताब्यात घेतले आहे व एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. कायद्याचा व पोलिसांचा कोणताच धाक या युवकांच्या मनात राहिला नसल्याचेच या घटनेवरून दिसून येते.Conclusion:
Last Updated : Aug 20, 2019, 8:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.