ठाणे - शेतालगतच्या आंब्याच्या झाडाला रस्सीने गळफास घेऊन एका ३५ वर्षीय अनोळखी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील पाये गावच्या हद्दीतील मोगर नाला येथील शेतात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - 'फेसबुक'वरील मैत्री पडली महागात; मैत्रिणीने घातला मित्राला गंडा
या आत्महत्येची नोंद भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पाये येथील शेतकरी भावेश कमलाकर खारखंडी हे आज सकाळी शेतावर गेले असता त्यांना आंब्याच्या झाडाला एका तरुणाचा मृतदेह लोंबकळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलीस पाटलांना दिली असता, याबाबत तत्काळ भिवंडी तालुका पोलिसांना कळवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.
हेही वाचा - झाडाझुडुपात आढळली एक महिन्याची जिवंत 'नकोशी', परिसरात खळबळ
मृत तरुणाची ओळख पटवून वारसांचा शोध घ्यावा लागणार आहे. यासाठी मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला आहे. या अनोळखी तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या का केली? याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोतिराम पवार करत आहेत.