ETV Bharat / state

धुळवड बेतली जीवावर, नदी पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

उल्हासनगर परिसरात राहणाऱ्या हरेशने आज धुळवडीचा रंग खेळला. त्यानंतर तो अंगावरील रंग काढण्यासाठी 3 मित्रांसोबत उल्हास नदीवर गेला होता. त्याठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने हरेश पाण्यात बुडाला.

young-man Drowned-in-river-thane
नदी पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू
author img

By

Published : Mar 10, 2020, 8:13 PM IST

ठाणे- कल्याण ते मुरबाड रोडवरील रायता पुलाजवळ एका तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. धुळवडीच्या दिवशी अंगावरील रंग काढण्यासाठी तो नदीवर गेला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. हरेश डिंग्रा (वय 36,रा.उल्हानसागर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

नदी पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

हेही वाचा- जगभरात कोरोनामुळे ४ हजार जणांचा मृत्यू; चीनबाहेर २८ हजार नागरिकांना लागण

उल्हासनगर परिसरात राहणाऱ्या हरेशने आज धुळवडीचा रंग खेळला. त्यानंतर तो अंगावरील रंग काढण्यासाठी 3 मित्रांसोबत उल्हास नदीवर गेला होता. त्याठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने हरेश बुडत होता. त्याच्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्याच्या नाका तोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, हरेशचा मृतदेह नदी पात्रातून काढून उत्तरणीय तपासणीसाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणला होता. तर घटेनची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलिसांनी घटनस्थळी जाऊन पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरक्षक रजपूत करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.