ठाणे Worker Death Case Thane: धनंजय गोपाळ चौहान (३० वर्षे, रा. कोलशेत, मूळचा उत्तरप्रदेश) असं मृत कामगाराचं नाव आहे. घटनास्थळी वागळे इस्टेट पोलिसांनी धाव घेऊन अपघाताची चौकशी सुरू केली. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. (Worker dies on Metro work)
यापूर्वीही घडले आहेत अपघात : मेट्रो-४ मार्गिकेच्या निर्मितीदरम्यान यापूर्वी अनेक अपघात झाल्याची नोंद आहे. काही महिन्यांपूर्वी मेट्रोचा पत्रा अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. मागील काही दिवसांपासून मेट्रोच्या कामाला मोठ्या प्रमाणात गती देण्यात आलेली आहे. यामुळेच मेट्रोचं काम जवळपास सर्वच भागात अहोरात्र सुरू आहे. अशावेळी कामात हलगर्जीपणा केल्यानं असे अपघात होत असून हे रोखले पाहिजेत, असं मत ठाणेकरांनी व्यक्त केलं. पोलिसांनी देखील या अपघातास कोण जबाबदार आहे, याचा शोध घेणार असल्याचं सांगत दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन देखील दिलं आहे.
पुण्यातही घडली अशीच घटना : इमारतीवरून पडून कामगारांचा मृत्यू झाल्याची अशीच एक घटना पुण्यातील कोथरूड भागात घडली होती. यात पुणे शहरात कोथरूड परिसरात बांधकाम काम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना 26 ऑक्टोबर, 2019 रोजी घडली होती. मोहम्मद (वय 20) आणि मुशीर बुराहरहेमान (वय २४) असं मृत मजुरांचं नाव होतं. हे दोघेही पश्चिम बंगालचे रहिवासी होते.
झुला तुटल्याने घडली दुर्घटना : कोथरूडमधील महात्मा सोसायटीजवळ 20 मजली इमारतीचं बांधकाम सुरू होतं. या इमारतीला रंग देण्याचं काम सुरू होतं. रंग देण्यासाठी बांधलेला झुला तुटल्याने त्यावर बसून रंगकाम करत असलेले दोन मजूर खाली पडले. तत्काळ अग्निशमन दल तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. मात्र, या दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता.
हेही वाचा: