ठाणे - ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी वाहतुकीच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या कळवा खाडीवरील नवीन पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. या पुलावरील 100 मी. मुख्य स्पॅन बसविण्याचे काम गुरुवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करून, सुरू करण्यात आले आहे.
ठाणे शहरात आणि कळवा परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ठाणे माहापालिकेच्या वतीने या नवीन पुलाचे काम सुरू आहे. गुरुवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या पुलावरील 100 मी. मुख्य स्पॅन बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा स्पॅन १०० मी. लांबीचा बास्केट हँडल आकाराचा असून, वजन ९५० मेट्रीक टन आहे. दरम्यान या पुलाचे 77 टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या डिसेंबरमध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याचा अंदाज आहे.
पुलामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार
या पुलाबाबत बोलताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हा एक अत्यंत महत्त्वाचा पूल आहे, या पुलामुळे ठाणे आणि कळवा परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार आहे. या ठिकाणी असा एखादा पूल असावा असे अनेक वर्षांपासून वाटत होते, ते स्वप्न आता सत्यात उतरणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर हा पूल येत्या डिसेंबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल अंस पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - गोकुळ निवडणूक लवकरच, महाविकास आघाडी मिळून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न - हसन मुश्रीफ
हेही वाचा - गर्डर बसविण्यासाठी मध्य रेल्वेवर पॉवरब्लॉक: अनेक मेल-एक्सप्रेस गाड्या रद्द