ठाणे - विवाहित प्रेयसीने प्रियकराच्या दररोजच्या छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली ( Women Suicide Boyfriend Stress Thane ) होती. ही घटना भिवंडी तालुक्यातील काल्हेर मधील जयमातादी कंपाऊंड परिसरात असलेल्या एका इमारतीत घडली होती. याप्रकरणी नारपोली पोलीस ( Narpoli Police ) ठाण्यात प्रियकरावर गुन्हा दाखल केला करण्यात आला होता. त्यानंतर तो फरार झालेला. मात्र, पोलिसांनी त्याचा शोध घेत शुक्रवारी ( 29 एप्रिल ) ठाण्यातून बेड्या ठोकल्या आहे. विकास अडगळे, असे अटक प्रियकराचे नाव ( Vikas Adgale Accused Arrested Thane ) आहे.
दोन वर्षांपासून राहत होती प्रियकरासोबत - मृतक २८ वर्षीय प्रेयसी मूळची पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एका गावात कुटुंबासह राहत होती. तिचा विवाह एका तरुणाशी झाला होता. पण, गेल्या दोन वर्षांपासून पतीला सोडून ती भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावात असलेल्या जयमातादी कंपाऊंड भागातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर प्रियकर विकास सोबत राहत होती. त्यातच काही महिन्यांपासून प्रियकर विकासला दारूचे व्यसन जडले होते. यामुळे दोघांमध्ये सतत भांडण होत. दररोज दारू पिऊन प्रेयसीला तो मारहाण करून तिचा सतत मानसिक व शारीरिक छळ करत होता. याच छळाला तिने किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. खळबळजनक बाब म्हणजे प्रेयसीने आत्महत्या केल्याची घटना प्रियकराने तिच्या नातेवाईक व पोलिसांपासून लपवून ठेवल्याचे समोर आले.
आरोपीला पोलीस कोठडी - २८ एप्रिल रोजी मृतकच्या ५० वर्षीय आईने नारपोली पोलीस ठाण्यात प्रियकर विकास विरोधात भादंवि. कलम ३०६, १८७ प्रमाणे गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी फरार झाला होता. मात्र, या गुन्ह्याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास राऊत यांनी त्याला शुक्रवारी ठाण्यातून अटक केली. आज ( ३० एप्रिल ) आरोपी प्रियकराला न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा - Dhananjay Munde : 'नवनिर्माण आणि नवनीत एकच आहेत हे कळले नाही'; मुंडेची सडकून टीका