ETV Bharat / state

धक्कादायक..! शिवसेना पदाधिकाऱ्याचा विवाहितेवर कारमध्ये बलात्कार - shivsena leader rape on women

शिवसेना पदाधिकाऱ्याने विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, पदाधिकाऱ्याने आरोप फेटाळून लावले आहेत.

rape case sainath tare
साईनाथ तारे
author img

By

Published : Feb 7, 2020, 5:17 PM IST

Updated : Feb 7, 2020, 7:27 PM IST

ठाणे - एका ३० वर्षीय विवाहितेचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्यावर पत्री पुलाजवळील निर्जनस्थळी कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन विविध कलमांसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. साईनाथ तारे असे आरोपी शिवसेना पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा - नांदेड : प्रेमी युगुलाला लुटणाऱ्या तीनही आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेला दोन वर्षांपूर्वी आरोपी साईनाथने व्यवसायात भागीदार राहण्यासाठी एका मॉलमध्ये बोलावले होते. मात्र, त्यावेळी पीडितेने भागीदारी व्यवसायास नकार दिल्याने आरोपीने पीडितेवर अश्लील शेरेबाजी केली. त्यांनतर पीडितेच्या फेसबुक व व्हॉट्सअ‌ॅपवर आरोपीने अश्लील फोटो व मॅसेज पाठवून व्हायरल करण्याची धमकी दिली. धमकीला घाबरून पीडिता आरोपीसोबत त्याच्या कारमध्ये गेली असता, त्याने पुन्हा तिच्यासोबत अश्लील चाळे करून फोटो काढले व पुन्हा फोटो व्हायरल करणार असल्याची धमकी देत, पीडितेवर बलात्कार केला.

खळबळजनक बाब म्हणजे आरोपी साईनाथने पीडितेला हा प्रकार कोणाला सांगितला तर तर तुझ्या मुलीला व पतीला ठार मारू, अशी धमकी दिली होती. तसेच अत्याचाराबाबत पीडिता जबाबदार असल्याचे नोटरीवर तिच्याकडून लिहून घेतले. या घटनाक्रमाने व आरोपीच्या धमकीने पीडिता भयभीत झाली होती. अखेर तिने धाडस करून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी साईनाथ विरोधात कलम 376, 354,354 (ड), 323, 506, आयटी कलम 67 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहुराजे साळवे करित आहेत. तर याबाबत साईनाथ तारे यांच्याशी संर्पक साधला असता त्यांनी पीडितेने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

हेही वाचा - संतापजनक ! घरगुती वादातून मुलानेच केली वडीलांची हत्या

Intro:kit 319Body:धक्कादायक ! शिवसेना पदाधिकाऱ्याचा विवाहितेवर कारमध्ये बलात्कार

ठाणे : एका ३० वर्षीय पीडित विवाहितेचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्यावर निर्जनस्थळी कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी पीडितेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेवून विविध कलमासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. साईनाथ तारे असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार ३० वर्षीय पीडित विवाहिता डोंबिवली पूर्व परिसरातील एका सोसायटीत राहत असून दोन वर्षांपूर्वी आरोपी साईनाथने पीडितेला व्यवसायात भागीदार राहण्यासाठी कल्याण पूर्वेतील मॉलमध्ये बोलावले होते. मात्र त्यावेळी पीडितेने भागीदारी व्यवसायास नकार दिल्याने आरोपीने पीडितेला मलाही भागीदारीत रस नसून तुझ्यामध्ये रस असल्याचे सांगत अश्लील शेरेबाजी केली. त्यांनतर पीडितेच्या फेसबुक व व्हाट्सअपवर आरोपीने अश्लील फोटो व मॅसेज पाठवून व्हायरल करण्याची धमकी पीडितेला दिली. धमकीला घाबरून पीडिता आरोपीसोबत त्याच्या कारमध्ये गेली असता, त्याने पुन्हा मोबाईलमध्ये पिडीतेचे चुंबन घेऊन हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, कार पत्रीपूल नजीकच्या निर्जनस्थळी नेवून तिच्यावर बळजबरीने कारमध्ये बलात्कार केला.
खळबळजनक बाब म्हणजे आरोपी साईनाथने पीडितेला अत्याचाराची वाचता कुठे केली तर तुझ्या मुलीला व पतीला ठार मारू अशी धमकी देत, अत्याचाराबाबत पीडिता जबादार असल्याचे नोटरीवर तिच्याकडून लहून घेतले. मात्र या घटनाक्रमाने व आरोपीच्या धमकीने पीडिता भयभीत झाली होती. मात्र अखेर तिने धाडस करून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिच्यावर गुदरलेला प्रसंग कथन करताच पोलिसांनी आरोपी साईनाथ विरोधात भादंवि कलम ३७६, ३५४, ३५४(ड), ३२३, ५०६, आयटी कलम ६७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराजे साळवे करीत आहेत. तर याबाबत साईनाथ तारे यांच्याशी संर्पक साधला असता त्यांनी पीडितेने केलेले आरोप फेटाळून लावले आहे.

Conclusion:rep
Last Updated : Feb 7, 2020, 7:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.